रोह्यात वाळू माफिया पुन्हा सक्रिय

By admin | Published: January 5, 2015 01:02 AM2015-01-05T01:02:59+5:302015-01-05T01:02:59+5:30

तहसिलदार उर्मिला पाटील यांनी काही दिवसापूर्वी अवैध आणि विनापरवाना रेती, डबर, माती उत्खनन करणा-यांवर कारवाईचा बडगा

The sand mafia activates in Rhea | रोह्यात वाळू माफिया पुन्हा सक्रिय

रोह्यात वाळू माफिया पुन्हा सक्रिय

Next

रोहा : तहसिलदार उर्मिला पाटील यांनी काही दिवसापूर्वी अवैध आणि विनापरवाना रेती, डबर, माती उत्खनन करणा-यांवर कारवाईचा बडगा उचलून चांगला हिसका दाखवला होता. परंतु तहसीलदारांच्या या कारवाईविरोधात वाळू माफियांनी एक नामी शक्कल लढविली आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत वाळूमाफियांनी सर्रासपणे वाळू उत्खनन सुरू केलेले असून रातोरात वाळूची वाहतूकही चालू झालेली आहे.
कुंडलिका नदीच्या पात्रात खारापाटील ते न्हावे व इतर परिसरात रात्रीच्या वेळी राजरोसपणे बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन पुनश्च सुरू आहे. विशेष म्हणजे रात्री ९ नंतर वाळू उत्खननाला सुरुवात केली जाते. त्यानंतर मध्यरात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत नदीतून काढलेल्या वाळूचे डंपर व ट्रकद्वारे बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: The sand mafia activates in Rhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.