काँगेस कार्यालय तोडफोड प्रकरण , संदीप देशपांडे यांचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:36 AM2017-12-07T04:36:32+5:302017-12-07T04:36:44+5:30
काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठही जणांचा जामीन बुधवारी फेटाळण्यात आला.
मुंबई : काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठही जणांचा जामीन बुधवारी फेटाळण्यात आला.
आझाद मैदान परिसरातील मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात १ डिसेंबर रोजी तोडफोड केल्याने पोलिसांनी देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिल्ले, विशाल कोकणे, हरीश सोळुंकी आणि दिवाकर पडवळ यांना अटक केली. त्यांच्या अर्जावर बुधवारी झालेल्या सुनावणीत त्यांचा जामीन फेटाळण्यात आला.
देशपांडेसह आठही जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यांमध्ये ४५२ (मारहाणीसाठी घुसखोरी करणे) या अजामीनपात्र कलमामुळे त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. हा गंभीर गुन्हा असून तो सिद्ध झाल्यास किमान ७ वर्षांची शिक्षा आणि दंडात्मक रकमेची तरतूद आहे.