नालासोपाऱ्याच्या अमन सिंगचा प्रेयसीसह संगमनेरला खून

By admin | Published: January 7, 2016 12:31 AM2016-01-07T00:31:02+5:302016-01-07T00:31:02+5:30

येथील अमन सिंग व त्याची प्रेयसी नाशिक येथे राहणारी शर्वरी फडके या दोघांचे पुणे येथून अपहरण करून त्यांचा बोटा येथे खून करून त्यांचे मृतदेह

Sangamner murdered with the love of Amla Singh, a resident of Nalasparpara | नालासोपाऱ्याच्या अमन सिंगचा प्रेयसीसह संगमनेरला खून

नालासोपाऱ्याच्या अमन सिंगचा प्रेयसीसह संगमनेरला खून

Next

नालासोपारा : येथील अमन सिंग व त्याची प्रेयसी नाशिक येथे राहणारी शर्वरी फडके या दोघांचे पुणे येथून अपहरण करून त्यांचा बोटा येथे खून करून त्यांचे मृतदेह तेथील एका शेतात त्यांच्या अपहरणकर्त्यांनी जाळून टाकल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्या खून्यांना अटक केली आहे. या अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून यापूर्वी साडेचार लाख रुपये उकळल्याचेही सिद्ध झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा येथील हे दुहेरी हत्याकांड प्रेमप्रकरणाच्या ब्लॅकमेलिंगमधून घडल्याचे उघड झाले असून, या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले इंडिका व्हीस्टा वाहन घारगाव पोलिसांनी सिडको (नाशिक) येथून जप्त केले आहे.
बोटा शिवारात कच नदी परिसरातील पडीक शेतजमिनीत अमन सिंग (नालासोपारा, मुंबई) व शर्वरी फडके (नाशिक) यांचे जळालेले मृतदेह आढळले. मृतदेहाजवळ सापडलेल्या सोनसाखळीवरून घारगाव पोलिसांनी हत्याकांड उघडकीस आणले. पोलीस तपासात नाशिकच्या एका सैनिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या शर्वरी फडके व अमन सिंग यांचे प्रेम असल्याची माहिती पुढे आली.
या प्रेमप्रकरणात दोघांना आरोपी पंकज सोनवणे हा ब्लॅकमेल करीत होता. त्याने मयत अमन सिंगकडून साडेचार लाख रु पये उकळले होते. तरीही तो शर्वरी फडके हिच्याकडे दीड लाख रु पयांचा तगादा लावत होता. भीतीपोटी अमन सिंग व शर्वरी फडके हे दोघे त्यांच्या एका मित्राकडे चाकण (पुणे) येथे काही दिवस थांबल्याचे सोनवणे यास समजले. त्याने ३० डिसेंबरला मित्र विजय काचे व राहुल गोतीसे यांना नाशिकहून इंडिका व्हीस्टा कारमधून चाकणला नेले. त्या ठिकाणी दोघांना सोबत नेऊन शर्वरीकडे पैशांची मागणी केली असता त्यांच्यात प्रचंड वाद झाले. दरम्यान, तिघा आरोपींनी हत्याराने दोघांवर वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह इंडिकामध्ये टाकून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने आळेफाट्यास आणले. (प्रतिनिधी)

Web Title: Sangamner murdered with the love of Amla Singh, a resident of Nalasparpara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.