सांगली व जळगाव महानगरपालिकेच्या  प्रारूप मतदार याद्यांची 5 जूनला प्रसिद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 05:39 PM2018-05-24T17:39:04+5:302018-05-24T17:39:04+5:30

सांगली- मीरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी; तसेच वसई- विरार महानगरपालिकेतील रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीकरिता 5 जून 2018 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

Sangli and Jalgaon Municipal Corporation's draft voters lists publish on June 5 | सांगली व जळगाव महानगरपालिकेच्या  प्रारूप मतदार याद्यांची 5 जूनला प्रसिद्धी

सांगली व जळगाव महानगरपालिकेच्या  प्रारूप मतदार याद्यांची 5 जूनला प्रसिद्धी

Next

मुंबई - सांगली- मीरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी; तसेच वसई- विरार महानगरपालिकेतील रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीकरिता 5 जून 2018 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता विधानसभा मतदारसंघाच्या 21 मे 2018 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 5 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. तेव्हापासून त्यावर 14 जून 2018 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 27 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 30 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
 

Web Title: Sangli and Jalgaon Municipal Corporation's draft voters lists publish on June 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.