Sangli Lok Sabha Election ( Marathi News ) : सांगली लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदारसंघावर राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडला. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. दरम्यान, आज मतदानादिवशीच भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
"यांना नाचता येईना अंगण वाकड, खोटे आरोप केले जात आहे. काहीही नाही, पराभव समोर दिसत आहे म्हणून रडून सगळे प्रयोग सुरू आहे. सकाळी तीन वाजल्यापासून सर्वांना फोन सुरू आहेत, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर केली.
संजयकाका पाटील म्हणाले, सकाळी ३ वाजल्यापासून फोन करुन आमचं घर संपायला लागलं आहे असं सांगत आहेत. जिल्हा यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही. गुलामगिरीमध्ये राहणारा जिल्हा नाही, क्रांतीकारकांचा जिल्हा आहे. लोकांनी यांच्या घरात ३५ वर्षे सत्ता दिली होती. लोकांनी ते अनुभवले. यांना आजच पराभव किती फरकाने आहे ते कळेल. तिसऱ्यांदा मोठ्या फरकाने हॅट्रीक होईल, असंही खासदार संजयकाका पाटील म्हणाले.
विरोधकांकडून यंत्रणेचा गैरवार; विशाल पाटलांचा आरोप
निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये सूचना दिल्या असताना सुद्धा जाणून बुजून दुसऱ्या क्रमांकाचे ईव्हीएम मशीन डाव्या बाजूला पहिल्या क्रमांकाला ठेवल्याचे प्रकार काही ठिकाणी झाला असून विरोधकांकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे, असा विशाल पाटील यांनी केला.
विशाल पाटील यांनी पदमाळ येथे सपत्नीक मताधिकार बजावला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला.