सांगली एसपी, डीवायएसपीची अखेर उचलबांगडी, कोथळे हत्या प्रकरण भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 06:24 AM2017-11-24T06:24:16+5:302017-11-24T06:24:30+5:30

मुंबई/सांगली : पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाची निर्घृण हत्या झाल्यानंतर वादाच्या भोव-यात सापडलेले सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व शहर उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची गुरुवारी उचलबांगडी करण्यात आली.

Sangli SP, DYSP, finally took off, Kothale murder case was filed | सांगली एसपी, डीवायएसपीची अखेर उचलबांगडी, कोथळे हत्या प्रकरण भोवले

सांगली एसपी, डीवायएसपीची अखेर उचलबांगडी, कोथळे हत्या प्रकरण भोवले

Next

मुंबई/सांगली : पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाची निर्घृण हत्या झाल्यानंतर वादाच्या भोव-यात सापडलेले सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व शहर उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची गुरुवारी उचलबांगडी करण्यात आली. शिंदे यांची नागपूरला राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी तर काळे यांची सोलापूर शहरात बदली करण्यात आली.
बदलीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमती दिल्यानंतर गृह विभागाने आदेश जारी केले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री शनिवारी सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर जात आहेत. शिंदे यांच्या जागी कोल्हापूरचे अप्पर अधीक्षक सुहेल शर्मा तर दीपाली काळे यांच्या जागी नांदेडच्या देगलूर विभागाचे उपअधीक्षक वीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
होत होती बदलीची मागणी
सांगली पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अटक केलेल्या अनिकेत कोथळेची त्याच रात्री उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी मारहाण करून हत्या केली. तसेच मृतदेह जाळला. या प्रकरणी कामटे याच्यासह पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह एसपी, डीवायएसपींची बदली करण्याची मागणी होत होती.

Web Title: Sangli SP, DYSP, finally took off, Kothale murder case was filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.