‘शाळेतील मुलींना पाच रूपयांत सॅनेटरी नॅपकीन’
By admin | Published: June 1, 2017 03:31 AM2017-06-01T03:31:09+5:302017-06-01T03:31:09+5:30
राज्यात अस्मिता योजना राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत महिला बचत गटांद्वारे सॅनेटरी नॅपकीन सवलतीच्या दरात देणार आहेत.
Next
मुंबई : राज्यात अस्मिता योजना राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत महिला बचत गटांद्वारे सॅनेटरी नॅपकीन सवलतीच्या दरात देणार आहेत. शाळेतील मुलींना पाच रूपयात सॅनेटरी नॅपकीन देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुलपात्र परंतु घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसल्यामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या कुटुंबांना ५०० चौ. फु. जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यासाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांचा जागेचा प्रश्न सुटला असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.