‘ती सॅनिटरी पॅड बँक’चा वर्सोव्यात शुभारंभ
By admin | Published: May 29, 2017 03:52 AM2017-05-29T03:52:42+5:302017-05-29T03:52:42+5:30
वर्सोवा परिसरातील स्त्रियांसाठी सॅनेटरी नॅपकिन एटीएम आणि डिस्पोजल मशीन योजना २१ एप्रिल रोजी स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर
मनोहर कुंभेजकर / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्सोवा परिसरातील स्त्रियांसाठी सॅनेटरी नॅपकिन एटीएम आणि डिस्पोजल मशीन योजना २१ एप्रिल रोजी स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर सुरू केली. आता ‘ती फाउंडेशन’ आणि लोकसहभागातून त्या ‘ती सॅनेटरी पॅड बँक’ ही महत्वाकांक्षी योजना देशभर
राबवणार आहेत. त्याचा शुभारंभ रविवारी दुपारी येथील
रेनिसन्स क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री झिनत अमान, निशिगंधा वाड, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे आणि अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज वयात येणाऱ्या १३ टक्के मुलींना मासिक पाळीबद्दल माहिती नसते. तसेच शाळांमधील मुलींच्या गळतीमागे मासिक पाळीतील सुविधांचा अभाव हे प्रमुख कारण असते. त्यामुळे मासिक पाळीबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे फडणवीस या वेळी म्हणाल्या. ‘या योजनेतून देशभरातील गरजू महिलांना दर महिन्याला १० सॅनेटरी नॅपकीन पॅड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन नोंदणी करू शकता,’ अशी माहिती आमदार डॉ. लव्हेकर यांनी या
वेळी दिली.