Join us

वर्सोव्याच्या पोशा नाखवा उद्यान मनपा शाळा संकुलामध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंग मशीन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 8:22 PM

महिलांच्या त्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची ' ती फाऊंडेशन' कार्यरत आहे

मनोहर कुंभेजकरमुंबई - महिलांच्या त्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची ' ती फाऊंडेशन' कार्यरत आहे. त्यांच्या ती फाऊंडेशन सॅनिटरी पॅड बँकेच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप, मोफत सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंग मशीन, डिस्पोझल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किटची सुविधा उपलब्ध करून दिली असून या महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांचा मोफत सल्लाही उपलब्ध करून दिला जातो.

मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंग मशीन, डिस्पोझल मशिन्ससाठी काल जाहिर झालेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात 2.5 कोटींची आर्थिक तरतूद प्रथमच करण्यात आली आहे.मात्र ही सुविधा येथील आमदार डॉ.लव्हेकर यांनी यापूर्वीच वर्सोवा विधानसभा मतदार संघात आणि देशात जोमाने सुरू केली आहे.

आज वेसाव्याच्या पोशा नाखवा उद्यान मनपा शाळेत उपलब्ध करून देण्यात आली.त्यांच्या 'ती फाऊंडेशन'च्या माध्यमातून याआधी येथील 8 शाळा व महाविद्यालय,के पश्चिम महापालिका विभाग कार्यालय,आंबोली व ओशिवरा पोलिस ठाणे येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.तर देशातील गरजू स्त्रियांसाठी त्यांनी पहिली डिजिटल सॅनेटरी पॅड बँक सुरू केली असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गेल्या 20 जानेवारीला त्यांना फर्स्ट लेडी पुरस्कार देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला होता.

 या पॅड बँकेतर्फे दरमहा प्रत्येक विद्यार्थिनीला १० सॅनिटरी पॅड,मेन्स्ट्रुअल हेल्थ किटमध्ये  विविध सूचना, मानसिक आधार देण्यासाठीची माहिती, २ निकर्स, पेनकिलर्स आणि सॅनिटरी नॅपकिन पॅड या गोष्टी आज उपलब्ध करून देण्यात आल्या.

 " बेटी तो है जग कि जननी, हमे रक्षा अब इसकी है करनी ", "बेटी कुदरत का है उपहार, इसको जिने का दो उपहार", " बेटीको मत समझो भर यह तो है ईश्वर का उपहार" असे संदेशदेणारे फलक, फुलांची आकर्षक रांगोळी, स्काऊट गाईडचीसलामी देऊन पोशा नाखवा उद्यान मनपा शाळा संकुलामध्ये आमदार डॉ .लव्हेकर यांचे जोरदार स्वागत झाले. निमित्तहोते देतील पहिली डिजिटल सॅनिटरी बँकेची स्थापनाकरणाऱ्या डॉ. भारती लव्हेकर यांनी वेसावे, यारी रोड येथीलपोशा नाखवा उद्यान मनपा शाळा संकुलातील विद्यार्थिनीआणि शिक्षकांच्या सोयीसाठी सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंगमशीन, डिस्पोझल मशिन्स आणि मेन्स्ट्रुल हेल्थ किट उपलब्ध करून दिली असून त्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाला.

येथील विद्यार्थिनी आणि शिक्षकांशी संवाद साधतानाआमदार डॉ.लव्हेकर म्हणाल्या की, पोशा नाखवा उद्यानमनपा संकुलातील शाळांना आज सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंगमशीन, मेन्स्ट्रुअल हेल्थ किट आणिडिस्पोजेबल मशीन उपलब्ध करून दिले आहे. पाळी आलेल्या मुलींचीकाळजी कशी घ्यावी यासाठी मेन्स्ट्रुअल किट आम्ही उपलब्धकरून देतो. हे किट मुख्याध्यापकांनी त्यांच्या दालनामध्येदर्शनी भागात ठेवावे.तसेच शालेय मुलींमध्ये मासिक पाळीबाबत अवेअरनेस व्हावा यासाठी अवेअरनेस कॅम्पही घेण्यात येतील” असेही त्या म्हणाल्या.विद्यार्थिनींशी मुक्तसंवाद साधत त्यांची आपुलकीने त्यांनी विचारपूस केली.त्यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थिनीला १० सॅनिटरीनॅपकिन्सचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी तेलगू शाळेचे मुख्याध्यापक व इमारत प्रमुख कैलास झुमडी आणि शिक्षण निरीक्षक तौहीद शेख यांच्या हस्ते आमदार डॉ.लव्हेकर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर वार्ड क्रमांक ६० चे नगरसेवक व के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष  योगीराज दाभाडकर यांचा सत्कार कैलास झुमडी यांच्या हस्ते,उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका शबाना शेख यांच्या हस्ते वॉर्ड क्रमांक ६३ च्या नगरसेविका रंजना पाटील यांचा सत्कार केला.तर मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता सागवेकर यांच्या हस्ते माजी नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेचे विद्यार्थी,विद्यार्थिनी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.