स्वच्छता अभियान : २ हजार ७८० टन कचरा संकलित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 06:12 PM2020-11-13T18:12:07+5:302020-11-13T18:12:29+5:30

Garbage collected : दररोज २ मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज-निर्मिती

Sanitation campaign: 2 thousand 780 tons of garbage collected | स्वच्छता अभियान : २ हजार ७८० टन कचरा संकलित

स्वच्छता अभियान : २ हजार ७८० टन कचरा संकलित

Next

 

मुंबई : मुंबई स्वच्छ रहावी; या उद्देशाने महापालिकेकडून गुरुवारी एक विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १५ हजार २३० महापालिका कर्मचा-यांसह २ हजार ८८४ स्वयंसेवक सहभागी झाले. या अंतर्गत दिवसभरात २ हजार ७८० टन कचरा संकलित करण्यात आला. मोहिमेला मुंबई पोलीस दलाचे सहकार्य लाभले.

एक दिवसीय मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये, उद्याने, पुतळे व स्मारके, बस थांबे, तलाव आणि स्वच्छतागृहे, पर्यटन स्थळे, भाजी मंडई, वाणिज्यिक क्षेत्रे, उड्डाणपूल, चौपाट्या, रस्ते येथे स्वच्छता करण्यात आली. यामध्ये लोकप्रतिनिधी, अशासकीय संस्थांचे सभासद, स्‍वच्‍छ मुंबई प्रबोधन अभियानाचे स्‍वंयसेवक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार संख्‍येने सहभागी झाले होते. विविध कंत्राटी संस्थांनीही यात सहभाग घेतला. अत्याधुनिक स्वरुपाची यंत्रसामुग्री प्रभावीपणे उपयोगात आणण्यात आली.

हाजी अली परिसरालगत असणा-या १ हजार ४०० चौरस फूट आकाराच्या भूखंडावर कचऱ्यापासून वीज-निर्मिती करण्याच्या पथदर्शी प्रकल्पाचे काम सध्या सुरु आहे. मोहिमे अंतर्गत या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रस्तावित प्रकल्पाची क्षमता ही दररोज २ मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज-निर्मिती करण्याची असून, या प्रकल्पातून दरवर्षी १ लाख ८२ हजार युनिट एवढी वीज-निर्मिती होईल असा अंदाज आहे.
 

Web Title: Sanitation campaign: 2 thousand 780 tons of garbage collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.