मध्य रेल्वेने साधला स्वच्छता संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:25+5:302021-09-19T04:07:25+5:30
मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी १६ सप्टेंबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा देऊन स्वच्छता पंधरवडा सुरु ...
मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी १६ सप्टेंबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा देऊन स्वच्छता पंधरवडा सुरु केला आहे. त्याअंतर्गत स्वच्छता संवाद करण्यात आला.
''स्वच्छता संवाद'' या थीम अंतर्गत शनिवारी मध्य रेल्वेवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गाड्या, स्थानके आणि रेल्वे परिसर यांच्या देखभालीसाठी लोकांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच स्थानकांवर सार्वजनिक घोषणा करण्यात आल्या आणि कचराविरोधी, प्रदूषण करणाऱ्या घटकांबद्दल आणि प्लास्टिकच्या एकल वापराला आळा घालण्याकामी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोहिमा आयोजित करण्यात आल्या. या ''स्वच्छता संवाद'' मोहिमेत सुमारे २००० कर्मचारी आणि प्रवासी सहभागी होते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर बायो-टॉयलेटचा वापर आणि त्याचे फायदे याविषयी मोहीम आयोजित करण्यात आली होती. प्रवाशांमध्ये त्यांचा प्रवास स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी जागरुकता करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या प्रवेशद्वाराजवळ जैव-शौचालयाशी संबंधित पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. स्थानके, रुग्णालये तसेच घरातील रहिवाशांना परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सल्ला देण्यात आला आणि एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या बंदीवर भर देण्यात आला. स्थानकांवर कचराविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आणि अस्वच्छता करणाऱ्यांना दंड करण्यात आला. श्रमदान उपक्रम आणि स्वच्छता उपक्रम देखील हाती घेण्यात आले ज्याला प्रवाशांनी अभिप्राय म्हणून चांगली प्रशंसा केली.