मुंबई : सध्या कोरोनावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझेशन टनेल उभारण्यात येत आहेत. काही ठिकाणी तशा विशिष्ट व्हॅनही तयार केल्या आहेत. पुण्यात नायडू हॉस्पिटलमध्ये असे टनेल उभारण्यात आले आहे. जगभरातही असे टनेल ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. मात्र असे टनेल उभारु नका, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
चेन्नईच्या आरोग्य संचालकांनी एक पत्र प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत म्हटले की, डिस्इन्फेक्टंट टनेल वापरल्यामुळे लोक हॅन्डवॉशचा वापर कमी करतील आणि त्या टनेलमधून आल्यामुळे लोकांना आपण सॅनिटायझेशन वापरल्याचे खोटे समाधान मिळेल. तसेच शरीरावर अल्कोहोल, क्लोरिन, लायझॉल याचा फवारा मारणे आरोग्यास अपायकारक आहे; शिवाय त्याचा उपयोगही होत नाही म्हणून असे टनेल वापरु नयेत.