सार्वजनिक ठिकाणांवर सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन लावावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:06 AM2021-05-21T04:06:07+5:302021-05-21T04:06:07+5:30
जनहित याचिका मुंबई महापालिकेला उत्तर देण्याचे निर्देश सार्वजनिक ठिकाणांवर सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन लावावे जनहित याचिका; मुंबई महापालिकेला उत्तर देण्याचे ...
जनहित याचिका
मुंबई महापालिकेला उत्तर देण्याचे निर्देश
सार्वजनिक ठिकाणांवर सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन लावावे
जनहित याचिका; मुंबई महापालिकेला उत्तर देण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मोफत मास्क वाटणे आणि सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन बसवण्यासंदर्भात करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी दिले.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रेल्वेस्थानक, बसस्थानक, बस, रेल्वे व झोपडपट्ट्यांमध्ये सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन बसवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका एका एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस.पी. तावडे यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेला दिले.
बसेस, रस्ते आणि फूटपाथ दररोज सॅनिटाइज करण्यात येतात, अशी माहिती बेस्टच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. ‘जर महापालिका सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन बसवणार असेल तर त्यांच्या रक्षणासाठी पालिकेला सुरक्षारक्षकही नेमावे लागतील. फूटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीने ही मशीन चोरली तर काय करणार? मशीन बसवण्याचा खर्च कोण देणार? असे सवाल न्यायालयाने उपस्थित केले. तसेच या याचिकेवर पालिकेला तीन आठवड्यांनी उत्तर देण्याचे निर्देश दिले.
..............................