मुंबई पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:22 AM2020-04-10T11:22:05+5:302020-04-10T11:22:35+5:30

पोलीस आयुक्तालयात लवकरच वॉक वेची बांधणी, मोटार वाहन विभागाकड़ून निर्मिती

Sanitizer van for Mumbai police | मुंबई पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन

मुंबई पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन

Next

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून अहोरात्र तैनात असणाऱ्या पोलिसांसाठी मोटार वाहन विभागाकड़ून सॅनिटायझर व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी एक व्हॅन मुंबई पोलीस  दलात दाखल झाली आहे. अशा एकूण ५ व्हॅन शुक्रवारपासून बंदोबस्तावरील पोलिसांना निर्जंतुक करणार आहे. 

गुरुवारी  मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या वाहनाची पाहणी केली. सॅनिटायझर व्हॅन दाखल झाल्याच्या वृत्ताला पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दुजोरा दिला आहे. गृहविभागाकड़ून १० हजार वैयक्तिक सुरक्षा कीटचे मुंबई पोलिसांना वाटप केले. ४५ हजारांचा फ़ौजफाटा असलेल्या मुंबई पोलीस दलातील प्रत्येक पोलीस अधिकारी, अंमलदाराला वैयक्तिक सुरक्षा कीट(पीपीई) पुरवणे शक्य नाही. अशात त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरवाहन विभागाने(एमटी) पाच विशेष वाहने तयार करण्यास घेतली आहेत. यापैकी दोन व्हॅन सध्या तयार आहे. या व्हॅनमध्ये निर्जंतुक करण्यासाठी वापर होत असलेल्या औषधी रसायनाचा फवारा सुरु असणार आहे. जेणेकरून या वाहनात प्रवेश करून परतणाºया पोलिसावर फवारणी केली होईल. त्यामुळे बंदोबस्तावरील  अधिकारी, अंमलदारांना पायापासून डोक्यापर्यंत निर्जंतूक करण्यास मदत होणार आहे. ही पाचही वाहने मुंबई पोलिसांच्या दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिाम आणि उत्तर प्रादेशिक विभागांत फिरणाऱ आहेत. आणि बंदोबस्तावरील प्रत्येक पोलीस अधिकारी, अंमलदाराला किमान दोन वेळा निर्जंतूक करतील. त्यामुळे पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

 तर दुसरीकडे मुंबई पोलीस  आयुक्तालयात लवकर वॉकवे ची बाँधणी होणार आहे. यात पोलीस ठाण्यांत किंवा महत्वाच्या कार्यालयांत ये जा करणाºया प्रत्येकाला निर्जंतूक करण्यास मदत होणार आहे. याची जबाबदारीही मोटरवाहन विभागाकड़े देण्यात आली असून लवकरच ते बसविन्यात येणार आहे. तसेच पोलीस ठाण्याभोवतीही अशा प्रकारे वॉक वे बांधन्याबाबतही प्रयत्न सुरु आहे.

Web Title: Sanitizer van for Mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.