संजय दत्तला तिसऱ्या टप्प्यातील फुफ्फुसाचा कॅन्सर; उपचारांसाठी परदेशी जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 11:09 PM2020-08-11T23:09:59+5:302020-08-11T23:35:01+5:30
चित्रिकरणापासून ब्रेक घेत असल्याचं संजयनं आज ट्विट करून सांगितलं होतं
ठळक मुद्देसंजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर; लवकरच उपचारांसाठी अमेरिकेला जाण्याची शक्यताचित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी ट्विट करून दिली माहितीउपचारांसाठी ब्रेक घेत असल्याचं संजय दत्तचं ट्विट
मुंबई: अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे संजय दत्त उपचारांसाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. आपण चित्रिकरणापासून काही वेळ लांब राहणार असल्याची माहिती आज संध्याकाळी संजय दत्तनं ट्विटरच्या माध्यमातून दिली. वैद्यकीय उपचारांसाठी ब्रेक घेत असल्याचं संजय दत्तनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. (Sanjay Dutt diagnosed with lung cancer)
— Sanjay Dutt (@duttsanjay) August 11, 2020
'मित्रांनो, मी वैद्यकीय उपचारांसाठी थोडा ब्रेक घेत आहे. माझं कुटुंब आणि माझा मित्र परिवार माझ्यासोबत आहे. माझी काळजी करू नका असं आवाहन मी माझ्या हितचिंतकांना करतो. तुमचं प्रेम आणि तुमच्या शुभेच्छांमुळे मी लवकरच परतेन,' असं संजय दत्तनं ट्विटमध्ये म्हटलं होतं.
चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी थोड्याच वेळापूर्वी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती दिली. आपण संजय लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करू, असंदेखील नाहटा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. संजय दत्त लवकरच उपचारांसाठी अमेरिकेला जाणार आहे.
Sanjay Dutt diagnosed with lung cancer. Let’s pray for his speedy recovery.https://t.co/IBc6j2XchZ
— Komal Nahta (@KomalNahta) August 11, 2020
याआधी ८ ऑगस्टला संजय रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संजयला डिस्चार्ज मिळाला.