मुंबई : पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला प्लॅस्टिकचा विळखा पडत आहे. पर्यटक मौजमजा करत असताना प्लॅस्टिक कचऱ्यामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात घालतात, अशीच घटना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली. एका पर्यटकास नॅशनल पार्कात फिरत असताना काही हरणे टाकलेल्या प्लॅस्टिक कचºयातून अन्न खात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पर्यटकाने ही खेदजनक बाब सोशल मीडियावर पोस्ट करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रोज सकाळी आणि सायंकाळी अशी दोनदा साफसफाई केली जाते. कचरा डब्यात टाकलेल्या कचºयामध्ये जर का खाण्याचे पदार्थ असतील तर हरणे शोधून खातात. परंतु प्लॅस्टिक कचरा पूर्णपणे उचलला जातो. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांची चांगल्या प्रकारे तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान प्लॅस्टिकच्या वस्तू आढळल्या तर त्या वस्तूचे डिपॉझिट घेतले जाते. तसेच गुन्हा केला असेल तर दंड ठोठावला जातो. मात्र, पर्यटकांमध्येही प्लॅस्टिक बंदीची जनजागृती झाली पाहिजे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाºयांनी दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्लॅस्टिकच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 2:18 AM