बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला शिवसेना नेते राऊत यांनी चांगलंच सुनावलं. त्याला कंगनानंही प्रत्युत्तर दिल्यानं हा वाद आणखी वाढला. त्यात राऊत यांनी शनिवारी एका चॅनेलशी बोलताना कंगनाप्रती अपशब्द उच्चारले आणि कंगनानं एक व्हिडीओ पोस्ट करून त्याला प्रत्युत्तर दिलं. यावेळी कंगनानं राऊत यांच्यावर टीकेचा भडीमार केला.
या 'इमोशनल ब्लॅकमेल'चं काय करायचं?; कंगनानं शेअर केली 'घर की बात'
''संजय जी तुम्ही माझ्याबद्दल अपशब्द वापरले... तुम्ही एक मंत्री आहात आणि हे तुम्हाला माहितच असेल की या देशात तासाला अनेक महिलांवर बलात्कार होत आहे, त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे, अॅसिड हल्ला केला जातोय. तुम्हाला माहित्येय याला जबाबदार कोण आहे? तुम्ही माझ्याप्रती अपशब्द वापरून जी मानसिकता दर्शवलीत, ही त्याला जबाबदार आहे. या देशातील मुलगी तुम्हाला कधीच माफ करणार नाही,'' असे तिनं या व्हिडीओत म्हटलं.
महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी राज्यासाठी काय केलं? कंगनाचा तिखट सवाल
आमीर खान, नसरुद्दीन त्यांना कुणीच काही म्हटलं नाही.''या देशात राहण्याची भीती वाटते, असं जेव्हा आमीर खान म्हटला होता. त्यावेळी कुणीच असे अपशब्द वापरले नाहीत. नसरुद्दीन शाह यांनाही कुणीच प्रत्युत्तर दिलं नाही. मुंबई पोलिसांचे मी कौतुक करताना थकत नव्हती. पण, पालघर साधु हत्या असेल किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल त्यावरून मी त्यांची टीका केली, तर ती माझी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,''असंही ती म्हणाली.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही''मी तुमच्यावर टीका करते, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. मी 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय.. तुमचे लोक मला ठार मारू अशा धमक्या देत आहेत. मी सांगते तुम्ही माराच... या देशातील मातीचं कर्ज रक्त सांडूनच निभावता येईल. भेटूया 9 सप्टेंबरला. जय हिंद, जय महाराष्ट्र,''असं आव्हान कंगनानं दिलं.
पाहा ती काय म्हणाली...
View this post on InstagramA post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut) on