Join us

युती नसेल तर 'रावसाहेब दानवें'चाही पराभव निश्चित, संजय काकडेंचं भाकीत

By राजा माने | Published: January 31, 2019 6:06 PM

माझे राजकीय अंदाज म्हणजे "मटका" म्हणणाऱ्यांची कीव येते. माझे अभ्यासपूर्ण शास्त्रशुद्ध सर्वेक्षण असते, त्यातून अंदाज असतो.

राजा माने

मुंबई - माझे राजकीय अंदाज म्हणजे "मटका" म्हणणाऱ्यांची कीव येते. माझे अभ्यासपूर्ण शास्त्रशुद्ध सर्वेक्षण असते, त्यातून अंदाज असतो. त्याला मटका म्हणणारे पुणे, महाराष्ट्र आणि देशात पक्षाची आलेली सत्ता म्हणजे "मटका" लागला, असे म्हणतील काय, असा सवाल भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला. युतीबाबत त्यांच्या स्पेशल सर्वेद्वारे त्यांनी हे भाकित वर्तवलं आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेची युती झाल्यास भाजपालाचा सर्वाधिक फायदा होईल, असे काकडे यांनी सांगितले. मात्र, युती न झाल्यास भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरेल, पण, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचाही निश्चित पराभव होईल, असेही काकडे यांनी स्पष्ट केले. संजय काकडे यांनी लोकमतशी बोलताना आगामी निवडणुकांबाबत आपला सर्वेक्षण अंदाज वर्तवला आहे. 

खासदार संजय काकडे यांनी वर्तवललेल्या निवडणूक निकालांबद्दलच्या आकड्यांची नेहमीच चर्चा होते. अनेकदा काकडे यांनी वर्तविलेलं भाकित खरं ठरलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाला 92 जागा मिळतील असा अंदाज काकडेंनी वर्तवला होता. त्यावेळी, भाजपाने 98 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काकडेंचं सर्वेक्षण 90 टक्क्यांपेक्षा अधिकपटीने खरे ठरलं होतं. लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत काकडे यांना आगामी निवडणुकांच्या भाकिताबद्दल प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी काही अंदाज स्पष्ट केले तर उर्रवित अंदाज युतीच्या निकालानंतर 8 दिवसात सांगू असे ते म्हणाले. 

राज्यात भाजपा-शिवसेनेची युती झाल्यास दोघांनाही फायदा होईल. या युतीचा सर्वाधिक फायदा भाजपालाचा होईल, पण युती न झाल्यास भाजपाचा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दावनेंचा पराभव निश्चित असल्याचं भाकित काकडेंनी वर्तवल आहे. माझे आकडे हे मटक्याचे आकडे नसून सर्वेक्षण असतं, मेहनत आणि अभ्यास असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे देशाला सर्वाधिक खासदार देणारं राज्य आहे. त्यामुळे देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे आणि राज्यातील युतीकडे लागले आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाने युती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रतही शिवसेना-भाजापाची युती होणं त्यांच्याच फायद्याच असल्याचं काकडे यांनी सांगितलं.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहात का ? या प्रश्नावर बोलताना, मी इच्छुक असून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मी निवडणूक लढवू इच्छितो. मी 2020 पर्यंत राज्यसभा खासदार आहे. त्यामुळे मला निवडणूक लढविण्याची गरज नाही. पण, कार्यकर्त्यांची इच्छा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी मी 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी मैदानात उतरेल, असेही काकडेंनी म्हटले. तसेच भाजपने तिकीट न दिल्यास अनेक पर्याय असल्याचे सांगताना, एकप्रकारे भाजपाला इशाराच काकडे यांनी दिला आहे.

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :संजय काकडेरावसाहेब दानवेभाजपाशिवसेना