मुंबई - आमदार संजय निरुपम यांची मुंबईकाँग्रेस अध्यक्ष हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. अध्यक्ष पदावरून संजय निरुपम यांना हटवण्यासाठी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे ही मागणी केल्याची माहिती आहे. काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, भाई जगताप आणि गुरुदास कामत गटाच्या अनेक नेत्यांनी आज खर्गे यांची भेट घेऊन केली मागणी केली.
काँग्रेस अध्यक्ष आमदार संजय निरुपम यांच्या कामगिरीवर काँग्रेस पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे निरुपम यांची उचलबांगडी करण्याची मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आली आहे. निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांना हा बदल हवा आहे. संजय निरुपम यांच्या एकला चलो रे च्या भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती. त्यामुळे कामत गटाला पक्षात थांबवण्यासाठी फेरबद्दल होण्याची दाट शक्यता.
आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करण्याच्या हेतुने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांसोबत चर्चेला प्रारंभ केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्यावतीने खा. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील तर राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी आ. कपिल पाटील, डॉ. राजेंद्र गवई व माकपचे अशोक ढवळे यांची चर्चा झाली आहे.