दिंडोशीतील बेस्ट कामगारांच्या धरणे आंदोलनाकडे संजय निरुपम यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:28 AM2020-02-26T01:28:57+5:302020-02-26T01:29:10+5:30
माजी खासदार संजय निरुपम दुपारी पावणेतीन वाजता सहभागी होणार होते. मात्र त्यांनी या धरणे आंदोलनाकडे पाठ फिरवली, अशी चर्चा बेस्ट कामगारांमध्ये होती.
मुंबई : बेस्ट कामगारांच्या विविध मागण्या आणि खासगीकरणाच्या विरोधात दिंडोशी डेपोबाहेरील आंदोलनात मंगळवारी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम दुपारी पावणेतीन वाजता सहभागी होणार होते. मात्र त्यांनी या धरणे आंदोलनाकडे पाठ फिरवली, अशी चर्चा बेस्ट कामगारांमध्ये होती.
निरुपम येणार नसल्याचे सांगत दुपारी धरणे आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आली. बेस्ट प्रशासनाने कामगारांना बाहेर सोडले नसल्याने ते या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेमतेम ५० ते ६० कामगारांसमोर माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी आपल्या भाषणात बेस्ट कामगारांच्या समस्या मांडल्या. कामगारविरोधी धोरणे आणि खासगीकरणाच्या विरोधात प्रशासनावर टीका केली.