संजय पांडेही कायदेशीर लढाईच्या पवित्र्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:06 AM2021-03-24T04:06:22+5:302021-03-24T04:06:22+5:30

डीजीपीच्या नियुक्तीला देणार न्यायालयात आव्हान लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील सर्वात जेष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडेही आता न्यायालयीन ...

Sanjay Pandey also in the sanctity of legal battle! | संजय पांडेही कायदेशीर लढाईच्या पवित्र्यात !

संजय पांडेही कायदेशीर लढाईच्या पवित्र्यात !

Next

डीजीपीच्या नियुक्तीला देणार न्यायालयात आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील सर्वात जेष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडेही आता न्यायालयीन लढाईच्या पवित्र्यात आहेत. आपल्याला डावलून पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार कनिष्ठ अधिकाऱ्याला देण्याच्या निर्णयाला ते उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.

मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्याने नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांचा कारभार भ्रष्ट असल्याचा आराेप ‘लेटर बॉम्ब’द्वारे केला. त्याचबरोबर आपल्या बदलीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यासाठी होमगार्डमधून सुरक्षा महामंडळात बदली करण्यात आलेल्या संजय पांडे यांनी आपली सेवाज्येष्ठता वारंवार डावलली जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले हाेते. १९८६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेल्या पांडे यांनी आता सरकारच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. आपण सर्वात ज्येष्ठ असून आपल्याविरुद्ध गैरकारभार, भ्रष्टाचाराबद्दलचे एकही प्रकरण नाही, तरीही सरकार महत्वाच्या नियुक्तीमध्ये का डावलत आहे, त्याविरुद्ध लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sanjay Pandey also in the sanctity of legal battle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.