परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या चौकशीतून संजय पांडेंची माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:01 AM2021-05-03T06:01:00+5:302021-05-03T06:01:27+5:30

परमबीर सिंग यांनी आपल्या विरुद्धची चौकशी थांबविण्यासाठी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये पांडे यांनी आपण २० मार्चला मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप केला आहे.

Sanjay Pandey withdraws from inquiry against Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या चौकशीतून संजय पांडेंची माघार

परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या चौकशीतून संजय पांडेंची माघार

Next
ठळक मुद्देपरमबीर सिंग यांनी आपल्या विरुद्धची चौकशी थांबविण्यासाठी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये पांडे यांनी आपण २० मार्चला मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप केला आहे.

जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत महाविकास आघाडीला अडचणीत आणलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधातील प्राथमिक चौकशी करण्यास पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी नकार दिला आहे. त्याबाबत त्यांनी सरकारला पत्र लिहून असमर्थता कळविली आहे. त्यामुळे सरकारला आता त्यांच्याऐवजी दुसरा चौकशी अधिकारी नेमावा लागणार आहे.

परमबीर सिंग यांनी आपल्या विरुद्धची चौकशी थांबविण्यासाठी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये पांडे यांनी आपण २० मार्चला मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप केला आहे. त्याबाबतची सुनावणी मंगळवारी होणार असताना पांडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’मुळे राज्याचे राजकारण व पोलीस वर्तुळात खळबळ उडाली हाेेती. त्यामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला, तर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या घरी छापे टाकले. दरम्यानच्या काळात एक एप्रिलला राज्य सरकारने सिंग यांनी अखिल भारतीय सेवा नियमनाचा भंग केल्यासंदर्भात तसेच    (पान ५ वर)

Web Title: Sanjay Pandey withdraws from inquiry against Parambir Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.