राठोड 'शिवनेरी' तर सत्तार पन्हाळगडावर, नव्या मंत्र्यांचा संसार सी-फेसवर; बंगल्याचं वाटप झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:37 PM2022-08-23T14:37:29+5:302022-08-23T14:40:18+5:30

मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झाले असून आता विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळतेय.

Sanjay Rathod will live in Shivneri bungalow, Abdul Sattar Ministers have been allotted bungalows in mumbai | राठोड 'शिवनेरी' तर सत्तार पन्हाळगडावर, नव्या मंत्र्यांचा संसार सी-फेसवर; बंगल्याचं वाटप झालं

राठोड 'शिवनेरी' तर सत्तार पन्हाळगडावर, नव्या मंत्र्यांचा संसार सी-फेसवर; बंगल्याचं वाटप झालं

googlenewsNext

मुंबई - शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकूण 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापनेपासून अगोदरच विस्तारासाठी उशीर झाला होता, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका केली होती. त्यानंतर, मंत्र्यांच्या खातेवाटपाला होत असलेल्या दिरंगाईवरुनही शिंदे सरकारवर टिका करण्यात आली. मात्र, हळु हळु शिंदे सरकार आता एक एक स्टेप पुढे जाताना दिसून येत आहे. शिंदे सरकारमधील नवनियुक्त मंत्र्याना आता बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे. 

मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झाले असून आता विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळतेय. विधिमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळत आहे. तसेच, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना गुवाहटी ट्रीप व गद्दारी या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे सरकारकडून हळुवारपणे पुढील रणनिती आखली जात आहे. शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील न्यायालयीन लढाईसाठी आता खंडपीठ नेमण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे, आता ही लढाई आणखी पुढे काही दिवस चालणार आहेत. त्यातच, आज नवीन मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले. त्यानुसार, मंत्री उदय सामंत यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर, वादग्रस्त ठरलेल्या मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगल्यावर स्थान मिळालं. आहे. 


शिंदे सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन हा बंगला मिळाला असून दिपक केसरकर यांना रामटेक बंगला मिळाला आहे. अब्दुल सत्तार यांना पन्हाळगड (ब7) हा बंगला मिळाला आहे. तर, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना लोहगड या बंगल्याची चावी मिळाली आहे. तर राधाकृष्ण विखेपाटील रायलस्टोन बंगल्यावर राहणार आहेत. 

Web Title: Sanjay Rathod will live in Shivneri bungalow, Abdul Sattar Ministers have been allotted bungalows in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.