Join us

'संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा'

By महेश गलांडे | Published: March 01, 2021 6:10 PM

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते.

मुंबई - टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला. राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगतानाच या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. मात्र, संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यायला हवा, तशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, असे माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी म्हटलं. 

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. सर्व बाजूंनी घेरले गेलेले राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला, अशा प्रकारे राजीनामा द्यावा लागलेले राठोड हे पहिलेच मंत्री आहेत. याप्रकरणी पंकजा मुंडेंना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर, उत्तर देताना धनंजय मुंडेंच्या प्रकरणाबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली.  

कोरोना कालावधीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला, लोकांनी दिवाळीचे कार्यक्रम घेतले, हळदी कुंकूवाचे कार्यक्रम घेतले, तेव्हा कुठेही कोरोनाचे नियम पाळले नाहीत किंवा गुन्हे दाखल झाले नाहीत. सध्या वेगळेच ट्रेंड पहायला मिळत आहेत, तुम्ही चुकीचं असाल तरीही तुमच्यामागे लोकं आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. पुरोगामी महाराष्ट्रात असे चुकीचे ट्रेंड पाडू नये. सगळ्या राजकारण्यांना माझी विनंती आहे, चुकीचे ट्रेंड निर्माण करु नका, येणारी पिढी तेच अनुकरुन करेल, असे पंकजा यांनी म्हटलं. 

संजय राठोड यांनी राजीनामा दिला, आता निपक्षपातीपणे यंत्रणांनी तपास करावा. केवळ याच बाबतीत नाही, प्रत्येक बाबतीत तपास यंत्रणांनी हीच भूमिका घ्यावी. राजीनामा दिल्याने कोणाची प्रतिमा चांगली होत नाही, असेही त्यांनी म्हटलं. धनंजय मुंडे प्रकरणातील कुठल्याही गोष्टीचं मी समर्थन करु शकत नाही, सैधांतिक अन् तात्विकदृष्ट्याही मी समर्थन करत नाही. संजय राठोड यांनी राजीनामा दिलाय, असेच आरोप आणखी कोणावरही होत असतील तर त्यांनीही स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे, असे म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं. त्यानंतर, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, त्यांनी तो द्यावा अशी आमच्या पक्षाची मागणीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.    

टॅग्स :पंकजा मुंडेधनंजय मुंडेसंजय राठोडराजीनामा