Sanjay Raut Arrested: संजय राऊत यांना ED कडून अटक, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी मॅरेथॉन चौकशीनंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:46 AM2022-08-01T00:46:57+5:302022-08-01T00:47:44+5:30

Sanjay Raut Arrested by ED: घरी ९ तास तर ईडी कार्यालयात ८ तास चौकशी, त्यानंतर अखेर अटक

Sanjay Raut Arrested by ED regarding patra chawl fraud Mumbai Shivsena | Sanjay Raut Arrested: संजय राऊत यांना ED कडून अटक, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी मॅरेथॉन चौकशीनंतर कारवाई

Sanjay Raut Arrested: संजय राऊत यांना ED कडून अटक, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी मॅरेथॉन चौकशीनंतर कारवाई

googlenewsNext

Sanjay Raut Arrested by ED: शिवसेना खासदार संजय राऊत यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात आले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि अखेर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची सुमारे ८ तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आणि अखेर त्यांना ईडीने अटक केली.

दिवसभरात काय घडलं?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. या प्रकरणी चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीने चार वेळा समन्स बजावले होते. त्यांपैकी केवळ एकदाच ते चौकशीसाठी हजर राहिले. तीन वेळा ते गैरहजेर राहिल्यानंतर आज अखेर ईडीचे पथक थेट संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी ईडीच्या पथकाने झाडाझडती घेतली आणि त्यांची साडे नऊ तास चौकशी केली. त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र तपासात सहाकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत ईडीचे अधिकारी संजय राऊतांना मुंबईतील ईडी कार्यालयात घेऊन गेले. त्यानंतर तेथेही त्यांची सुमारे ८ तास चौकशी करण्यात आली आणि अखेरीस त्यांना अटक केल्याची बातमी मिळाली.

संजय राऊतांना भाजपा घाबरली; बंधू सुनील राऊतांची प्रतिक्रिया

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर सुनील राऊतांनी प्रतिक्रिया दिली. "भारतीय जनता पार्टी संजय राऊतांना घाबरली. संजय राऊतांना बोगस केस बनवून अटक करण्यात आली आहे. त्यांची उद्या सकाळी वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल. पण संजय राऊतांना चुकीच्या आरोपांखाली अडकवण्यात आले आहे. आम्ही न्यायायलात नक्कीच लढा देऊ. गोरेगांव च्या पत्राचाळ प्रकरणाचे आरोप करून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही नक्कीच या विरोधात आवाज उठवू", अशी माहिती बंधू सुनील राऊत यांनी दिली.

Web Title: Sanjay Raut Arrested by ED regarding patra chawl fraud Mumbai Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.