Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांना मांडवली करायची असती तर...' उद्धव ठाकरे स्पष्टचं बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 01:44 PM2022-11-10T13:44:07+5:302022-11-10T13:44:22+5:30

Sanjay Raut Bail: 'मला संजयला तुरुंगात भेटायचं होतं, पण ते शक्य झालं नाही.'

Sanjay Raut Bail: 'If Sanjay Raut wanted to go with bjp...' Uddhav Thackeray spoke clearly | Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांना मांडवली करायची असती तर...' उद्धव ठाकरे स्पष्टचं बोलले...

Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांना मांडवली करायची असती तर...' उद्धव ठाकरे स्पष्टचं बोलले...

Next

Sanjay Raut Bail: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. काल जामीन मिळाल्यानंतर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांचे कौतुक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

'मांडवली करायची असती तर...'
वमांडवली करायची असती, तर इतके दिवस संजय तुरुंगात राहिले नसते. आप, केसीआर, सोरेन आणि ममता दीदींना भाजप छळत आहे. हे सगळे एकत्र आल्यावर काय होईल, हे भाजपल्या दिसत नाहीये. आमी संजय, सुनिल, आई, वहिनी आणि मुलींचही कौतुक करेल. त्यांनीही मोठा लढा दिला आहे. मी मधल्या काळात भावूक झालो होतो, त्याला तुरुंगात भेटायचं होतं, पण ते शक्य नाही झालं. हा खडतर काळ त्याच्यासाठी होता, तसाच आमच्यासाठीही होता,' असं ते म्हणाले.

'केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे' 
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'सर्वप्रथम संजयच्या धाडसाचे कौतुक. न्यायालयाने मान्य केले की, कारवाई चुकीची होती. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे. अंगावर जा म्हणलं की, जातायतं. केंद्रीय न्यायमंत्री किरेन रिजिजू यांची काही वक्तव्ये आली, न्यायव्यवस्था अंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. हा गुन्हा होऊ शकतो की नाही, याची दखल न्यायदेवता घेईलच. न्यायालयाचा दुरुपयोग करुन अनेक पक्ष फोडले गेले, बेकायदेशीर अटक, खोट्या केसेस टाकल्या जात आहेत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
 

Web Title: Sanjay Raut Bail: 'If Sanjay Raut wanted to go with bjp...' Uddhav Thackeray spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.