Sanjay Raut: करारा जवाब मिलेगा... मोहीत कंबोजने दिलं संजय राऊतांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 05:45 PM2022-02-15T17:45:30+5:302022-02-15T17:57:52+5:30

आता मोहित कंबोज यांनी ट्विट करुन राऊतांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिलंय.

Sanjay Raut: Contract answer will be given ... Mohit Kamboj challenged Sanjay Raut | Sanjay Raut: करारा जवाब मिलेगा... मोहीत कंबोजने दिलं संजय राऊतांना चॅलेंज

Sanjay Raut: करारा जवाब मिलेगा... मोहीत कंबोजने दिलं संजय राऊतांना चॅलेंज

Next

मुंबई - राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. तसेच, किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख केला. तर, शेवटी मोहित कंबोज या भाजप नेत्याच्या नावाचा उल्लेख केला. आता, मोहित कंबोज यांनी ट्विट करुन संजय राऊत यांनी प्रत्यु्तर दिलंय. 

उद्या भाजपाचे साडेतीन नेते आत जातील असा इशारा देत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. हे साडेतीन नेते कोण असा सवाल राज्यातील लोकांना पडलेला असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटच्या क्षणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. फडणवीस यांचा एक फ्रंटमॅन आहे, मोहित कंबोज, असा आरोप संजय राऊत यांनी करताना या कंबोज यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याचे पैसे जमिनी खरेदी, प्रकल्प उभारण्यासाठी वापरल्याचे म्हटले आहे. तसेच हा कंबोज एकदिवस देवेंद्र फडणवीसांना बुडविणार असल्याचा गौप्यस्फोटही केला आहे. 

आता मोहित कंबोज यांनी ट्विट करुन राऊतांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिलंय. करारा जबाव मिलेगा.... असे म्हणत आपण संजय राऊत यांच्या बिनबुडाच्या आरोपावर पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. 


मुलीच्या लग्नावरुन भाजप नेत्याचा उल्लेख

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राऊत यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ईडीच्या धाडींची माहिती मुलुंडमधल्या दलालाला सर्वात आधी कशी काय मिळते, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. माझ्या मुलीच्या लग्नात असलेल्या मेहंदीवाल्याकडे ईडीवाले गेले, नेलपॉलिशवाल्याकडे गेले. मी कुठं कपडे शिवले हे विचारत माझ्या मुलुंडमधील टेलरकडेही ईडीवाले गेले होते. कितना पैसा दिया, क्या क्या दिया... अशी विचारणा केली. तुम्ही आमच्या घरात शिरताय, तुम्ही आमच्या मुलांपर्यंत जाताय, दुकानात येताय, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावेळी, एका माजी मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाचं उदाहरणही त्यांनी दिलं. भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईत मोठा सेट उभारला होता. हे मंत्रीमहोदय हे वनमंत्री होते, म्हणून हॉटेलमधील तो सेट फॉरेस्ट टाईपचा उभारला होता. या सेटमध्ये अंथरलेलं कारपेट हे 9.5 कोटी रुपयाचं होतं, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

१९ बंगल्यात पिकनिकला जाऊ

ठाकरे कुटुंबानं अलिबागमध्ये कोरलाईत १९ बंगले बांधले आहेत. ती बेनामी संपत्ती असल्याचा दावा मुलुंडमधल्या दलालानं केला आहे. कुठे आहेत १९ बंगले? चला आपण त्या बंगल्यात आपण पिकनिकला जाऊ, असं आव्हान राऊतांनी दिलं. माझं स्पष्ट आणि थेट आव्हान आहे. आपण चार बसेस करू आणि त्या १९ बंगल्यात पिकनिकला जाऊ. तिथे ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि बंगले तिथे नसतील तर मी त्याला जोड्यानं मारेन, असं राऊत म्हणाले.

जमीन खरेदीबाबतही दिलं स्पष्टीकरण

पाटणकर यांनी कुठलिही देवस्थानची जमीन खरेदी केली नाही. पाटणकरांनी देवस्थानची जमीन कुठे विकत घेतली हे दाखवा… पाटणकर आणि देवस्थानाचा काहीही संबंध नाही. 2014 साली सलिम बिलाखियाकडून ही जमिनी घेतली, त्यानंतर एकामागे एक अशी 12 जणांनी ही जमीन खरेदी केली. त्यात, 12 व्या नंबरला पाटणकर यांनी ही जमीन खेरदी केल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसेच, उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्याबाबतही राऊत यांनी विधान केलं. जर, 19 बंगले असतील तर आपण तिथं पिकनीकला जाऊ, मी 2 बस करतो, आपण मिळून तेथे पिकनीकला जाऊ, असे राऊत यांनी म्हटले. 
 

Web Title: Sanjay Raut: Contract answer will be given ... Mohit Kamboj challenged Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.