मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण आता वेगळ्या वळणावर जाऊ लागले आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अभिनेत्री कंगना राणौतवर नेते, अभिनेत्यांकडून टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. यातच कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, असे आव्हान दिल्याने हा वाद आता चिघळण्याची मोठा शक्यता निर्माण झाली आहे.
कंगनाच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे भडकले असून त्यांनी शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही, असा थेट इशारात दिला आहे. कंगनाला उद्देशून त्यांनी ''मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.'', असे तीव्र शब्दांत उत्तर दिले आहे.
चीनला तगडा झटका! PUBG, TikTok बॅनमुळे तब्बल 1.46 लाख कोटी बुडाले
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, अशा शब्दात कंगना राणौतने ट्विटरवरुन आव्हान दिले आहे. तिच्या या आव्हानानंतर भाजपात प्रवेश केलेल्या दंगल गर्ल बबिता फोगाटनं तिला वाघिण असं म्हणून खुलं चॅलेंज दिलं.
"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा", असा एल्गार कंगनाने केला. भाजपा नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने असे म्हटले आहे. "कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?" असा सवाल परवेश साहिब सिंह यांनी केला होता.
दरम्यान, "मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही. या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगना राणौतवर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'
रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार
IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा
चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा