Devendra Fadnavis : भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधानं?, संजय राऊतांना काही कामधंदा नाही; फडणवीसांचं रोखठोक प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:18 PM2021-05-24T16:18:54+5:302021-05-24T16:19:28+5:30

Sanjay Raut has no job Devendra Fadnavis slams over statement of MAHA Governor :विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांनवर टीका केली होती.

Sanjay Raut has no job devendra Fadnavis slams over statement of maha governor | Devendra Fadnavis : भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधानं?, संजय राऊतांना काही कामधंदा नाही; फडणवीसांचं रोखठोक प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधानं?, संजय राऊतांना काही कामधंदा नाही; फडणवीसांचं रोखठोक प्रत्युत्तर

Next

विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांनवर टीका केली होती. राज्यपालांवर केलेल्या टीकेवरुन राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे. संजय राऊत यांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वल पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.  Sanjay Raut has no job Devendra Fadnavis slams over statement of MAHA Governor.

राजभवनात कोणतं भूत आहे? विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या फायली कोणत्या भुताने पळवून नेल्या?, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता राजभवनातील विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीबाबत राजभवनच उत्तर देईल. त्यावर मी बोलू शकत नाही. पण भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधानं आहेत. हा निव्वळ पोरखेळ आहे. असा पोरखेळ कुणीही करू नये. संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

राज्यपालनियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी 'सामना'तून जोरदार टीका केली होती. राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल! असा खोचक सल्ला यांनी ‘सामना’तून देण्यात आला आहे.

Read in English

Web Title: Sanjay Raut has no job devendra Fadnavis slams over statement of maha governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.