Join us

'हे' एकच वाक्य सर्वाधिक वेळा बोलण्याचा विक्रम संजय राऊतांच्या नावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 1:03 PM

संजय राऊत यांनी "मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत यांनी "मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती आहे.

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने अटक केली आहे. एनआयएकडून सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर, राज्यातील भाजपा आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलाच सामना रंगताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांना टोला लगावलाय. 

संजय राऊत यांनी "मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती आहे. मुंबई पोलीस कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत पण राज्यात घुसायचं, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा, केंद्राचा दबाव आणि दहशत आहे हे दाखवायचं अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. हे सगळं राजकारण सुरू आहे. सचिन वाझेंना अटक झाली आहे. योग्य ती प्रक्रिया सुरू होईल. यावर मी बोलणार नाही. आरोप ठेवणं आणि प्रत्यक्षात आरोप सिद्ध होणं यामध्ये खूप मोठं अंतर आहे. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यानंतर, केशव उपाध्ये यांनी राऊतांना टोला लगावलाय. 

संजय राऊत यांच्या नावे एकच वाक्य सर्वाधिकवेळा बोलायचा विश्वविक्रम नोंदवला जाईल असं दिसतंय आणि ते वाक्य असेल, 'हा सरकार अस्थिर करायचा प्रयत्न आहे', असा टोला उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लगावला आहे.

वाझेंच्या नार्को टेस्टची मागणी

सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.    

टॅग्स :संजय राऊतभाजपाशिवसेना