सोमय्या स्वत: कंपनी शिपायांच्या घरी गेले अन् लाखो रुपये लाटले; संजय राऊतांचा नवा 'बॉम्ब'!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 08:47 AM2022-05-11T08:47:57+5:302022-05-11T08:51:02+5:30

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत दिवसेंदिवस नवनवे आरोप करत आहेत.

sanjay raut new tweet against kirit somaiya about nsel shares scam | सोमय्या स्वत: कंपनी शिपायांच्या घरी गेले अन् लाखो रुपये लाटले; संजय राऊतांचा नवा 'बॉम्ब'!

सोमय्या स्वत: कंपनी शिपायांच्या घरी गेले अन् लाखो रुपये लाटले; संजय राऊतांचा नवा 'बॉम्ब'!

googlenewsNext

मुंबई

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत दिवसेंदिवस नवनवे आरोप करत आहेत. सोमय्या विरुद्ध राऊत या वादात आज राऊतांनी पुन्हा एकदा सोमय्यांविरोधात नवा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असा नवा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात ट्विट्सची मालिका सुरू केली आहे. यात आज संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानवर सलग तिसऱ्यांदा आरोप केला आहे. 

"किरीट का कमाल: ३. किरीट सोमय्या यांनी NSEL ची ५६०० कोटी शेअर्सच्या घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे चौकशीची मागणी केली. मोतीलाल ओसवाल कंपनीची याप्रकरणी ED ने चौकशी केली. स्वत: किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनी शिपायांच्या घरी गेले होते. तमाशा केला. २०१८-१९ असे दोन वर्ष सोमय्याने मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्याच्या युवाक प्रतिष्ठानसाठी घेतले", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

'ही खंडणी नाही का? आप क्रोनोलॉजी समजिए', संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप

"माझ्या विरोधात कितीही खोट्या तक्रारी करा, पण...", संजय राऊतांचा सूचक इशारा!

संजय राऊत यांनी केल्या तीन दिवसांपासून किरीट सोमय्यांविरोधात ट्विटरवर आरोपांची मालिका सुरू केली आहे. यात राऊत यांनी मुख्यत्वे किरीट सोमय्यांशी निगडीत युवक प्रतिष्ठानला येणाऱ्या निधीवर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. 

'ही खंडणी नाही का?'
त्यापूर्वी संजय राऊत यांनी सकाळी 'ही खंडणी नाही का?', असे म्हणत एक ट्वीट केले होते. "ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधींचा निधी कसा काय मिळाला? हा काळा पैसा पांढरा करण्याचा डाव आहे. याचा हिशोब द्यावाच लागणार. मी धर्मादाय आयुक्त आणि तपास यंत्रणांकडे तक्रार केली आहे," असे संजय राऊत म्हणाले.

Web Title: sanjay raut new tweet against kirit somaiya about nsel shares scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.