संजय राऊतांना दिलासा नाहीच; आता पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 01:11 PM2022-11-02T13:11:19+5:302022-11-02T13:11:51+5:30

Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे.

sanjay raut next hearing on november 9, patra chawl land scam case | संजय राऊतांना दिलासा नाहीच; आता पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला

संजय राऊतांना दिलासा नाहीच; आता पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला

googlenewsNext

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. 

दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.

संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे. आजच्या सुनावणीवेळी त्यांचे कुटूंबदेखील कोर्टात हजर होते.

काय आहे प्रकरण? 
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना  खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. 

ईडीचा दावा... 
ईडीने केलेल्या दाव्यानुसार, जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असे ईडीने सांगितले. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले होते.

Web Title: sanjay raut next hearing on november 9, patra chawl land scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.