Devendra Fadnavis Replay To Sanjay Raut: मुंबईतीलसाकीनाका परिसरातील बलात्कार पीडितेचा आज उपचारादरम्यान राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणावरुन विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील बलात्काराची घटना शहराच्या लौकिकाला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून आरोपींना फाशीच होईल याबाबत प्रयत्न करायला हवेत, अशी मागणी केली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांनी मुंबईतील बलात्कार प्रकरणाचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे, असं म्हटलं आहे. याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राऊतांच्या विधानाला महत्त्वच दिलं नाही. "संजय राऊत काही एवढे मोठे नाहीत. त्यावर मी बोलण्याची काहीच गरज नाही", अशा एका वाक्यात फडणवीसांनी राऊतांना प्रत्त्युतर दिलं आहे.
मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, राजावाडी रुग्णालयात पीडितेचा मृत्यू
नराधमांना फाशीच झाली पाहिजेबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
'आता आमचे शब्द संपले!', मुंबई बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ यांना अश्रू अनावर
मुख्यमंत्र्यांना दिला सल्लाफडणवीसांनी यावेळी साकीनाका प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला देखील दिला आहे. "राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून तातडीनं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून एक विशेष जलदगती न्यायालय स्थापन करुन यात खटला चालवला जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि पोलिसांनी याप्रकरणाशी निगडीत इतर आरोपींचा तातडीनं शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत", असं फडणवीस म्हणाले.