Join us

संजय राऊत इतके मोठे नेते नाहीत, फडणवीसांचा शिवसेना खासदारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 1:06 PM

मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी भाजपाचे नेते राज्यपालांकडे जातात कारण राज्यपाल भाजपाचे कार्यकर्ते आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय, असा प्रश्न एका पत्रकाराने फडणवीस यांना विचारला

ठळक मुद्देआम्ही गेलो की ते (राज्यपाल) भाजपाचे नेते असतात आणि तुम्ही कंबरेमध्ये वाकून त्यांना नमस्कार करता तेव्हा ते कोणाचे नेते असतात?,” असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

मुंबई - पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी वापरण्याऐवजी पक्षाच्या वसुलीसाठी(police) वापरले जात आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही प्रश्न विचारण्यात आले. 

मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी भाजपाचे नेते राज्यपालांकडे जातात कारण राज्यपाल भाजपाचे कार्यकर्ते आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय, असा प्रश्न एका पत्रकाराने फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, “संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ आहे. तुमच्याकडे बातम्या नसतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचता. संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ, असे म्हणत फडणवीस यांनी राऊत यांना टोला लगावला. राज्यपाल हे संविधानानुसार प्रमुख आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही गेलो की ते (राज्यपाल) भाजपाचे नेते असतात आणि तुम्ही कंबरेमध्ये वाकून त्यांना नमस्कार करता तेव्हा ते कोणाचे नेते असतात?,” असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

फडणवीसांचा अहवाल भिजलेला लवंगी फटाका

फडणवीस यांनी दिलेल्या अहवालात सरकारबद्दल काहीही चुकीचं नाही, आपण तो अहवाल वाचावा. जुन्या सरकारवर निष्ठा असलेल्या अधिकाऱ्यांनी काही कागद बनवले असतील, चांगल्या हेतूने. या कागदाची काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्री ठरवतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कागदपत्रे दिली त्यात काडीचाही दम नाही. विरोधी पक्षनेते म्हणे काही बॉम्ब वगैरे घेऊन आले होते. पण, तो बॉम्ब नसून भिजलेला लवंगी फटका आहे. या फटाक्याला वातसुद्ध नव्हती, आम्हीच दिल्लीत कुठं स्फोट झाला का, हे शोधत होतो, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्लाय अहवालाची खिल्ली उडवली.  

मुख्यमंत्र्यांना बोलतं करावं

गृहमंत्री अनिल देशमुखांना एक क्षणही पदावर राहण्याचा हक्क नाही. शरद पवारांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या. राज्यात घडत असलेल्या मोठ्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत का नाही. राज्यपालांनी त्यांना बोलते करायला हवे. वसुली, बदल्यांचे रॅकेट या घटना धक्कादायक आहेत. मुख्यमंत्री यावर काहीच बोलत का नाहीत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पवारांनी त्यांच्या मंत्र्याला वाचविण्याचाच प्रयत्न केला.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनादेवेंद्र फडणवीस