Sanjay Raut: "गावाकडच्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलात कधी राहायला मिळणार; ही एक व्यवस्था असते"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 10:10 AM2022-06-19T10:10:27+5:302022-06-19T10:12:00+5:30

महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कल आहे

Sanjay Raut on vidhanparishad election: "When will the MLAs of the village get to stay in a five star hotel; this is an arrangement." | Sanjay Raut: "गावाकडच्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलात कधी राहायला मिळणार; ही एक व्यवस्था असते"

Sanjay Raut: "गावाकडच्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलात कधी राहायला मिळणार; ही एक व्यवस्था असते"

Next

मुंबई - राज्यात विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कार कोणाच्या बाजूने घडेल, हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील, त्यांची विकेट जाईल, असं विधान करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने निवडणुकीत अधिकच रंगत आली आहे. त्यामुळे, पक्षाच्या बैठकांना जोर आला असून, चारही मोठ्या पक्षांचे आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.

महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कल आहे. राज्यसभेत बसलेल्या फटक्यानंतर महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला आहे. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे उमेदवारांचा कोटा ठरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दगाफटका होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे कोटा ठरवणार आहेत. तसेच महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही, असा निर्वाळा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. त्यासाठी, चारही पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सध्या वास्तव्यास आहेत.

वेस्टीन हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत, ताज हॉटेलमध्ये भाजपचे आमदार, 4 सिझनला काँग्रेसचे आमदार आहेत, ट्रायडेंटमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत, असे म्हणत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, गावकडच्या आमदारांना इथं कधी राहायला मिळणार, असं उत्तर राऊत यांनी दिलं आहे.  

गावकडल्या आमदारांना इथं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी राहायला मिळणार, ही एक व्यवस्था असते. महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे, चांद्यापासून-बांद्यापर्यंत, प्रवासाच्या सुविधा आणि अनेक अडचणी यांतून त्यांना एकत्र मतदान करता यावं, त्यांना मार्गदर्शन करता यावं. मतदान कशारितीने करावं, काय करावं यासाठी त्यांना एकत्र बोलावलं जात असल्याचं  राऊत यांनी सांगितलं. 

आमदारांचा मुक्काम हॉटेलांत

शिवसेनेचे आमदार शुक्रवारी पवईतील हॉटेलकडे रवाना झाले. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदारही शनिवारपासून वेगवेगळ्या ठिकाणी आहेत.
 

Web Title: Sanjay Raut on vidhanparishad election: "When will the MLAs of the village get to stay in a five star hotel; this is an arrangement."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.