...ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात, CM ठाकरेंच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:02 PM2022-03-22T20:02:52+5:302022-03-22T20:03:33+5:30

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केले आहेत. ईडीनं थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर केलेल्या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Sanjay raut reaction on ED action against Rashmi Thackeray Brother shreedhar patankar | ...ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात, CM ठाकरेंच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले

...ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात, CM ठाकरेंच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले

Next

नागपूर-

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केले आहेत. ईडीनं थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर केलेल्या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरुन भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. "महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला ओळखतो. याची किंमत आज ना उद्या तुम्हाला चुकवावीच लागेल", असा इशारा देतानाच ईडीची कारवाई ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. 

"ईडीच्या कारवाईची संसदेत कालच माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता नाही तिथंच ईडीच्या सर्वाधिक कारवाया होत आहेत. एखाद्या राज्यात हरलो असेल तर ज्यांनी पराभव केला त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे", असं संजय राऊत म्हणाले. यूपीच्या ११ वर्षांच्या काळात २२ किंवा २३ कारवाया झाल्या. पण मोदी सरकारनं २५०० कारवाया केल्या. त्यातील काही कारवाया चुकीच्या पद्धतीनं होत्या. ते न्यायालयात नंतर स्पष्ट झालं, असंही संजय राऊत म्हणाले. 

"श्रीधर पाटणकर हे आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरेपर्यंत मर्यादित नाहीत. ते आमच्या सर्वांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. झारखंड, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात या ठिकाणीच जोरदार कारवाई सुरू आहे. गुजरात आणि इतर राज्यात ईडीने कार्यालय बंद केली आहेत असं वाटतं", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसंच गुजरातमध्ये सर्वात मोठा शिपयार्ड घोटाळा बाहेर आला. आतापर्यंत एकाही आरोपीला शिपयार्ड घोटाळ्यात अटक झाली नाही. त्यांची चौकशी झाली नाही. अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीलाही त्रासा दिला जात आहे. पण बंगाल आणि महाराष्ट्र झुकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Sanjay raut reaction on ED action against Rashmi Thackeray Brother shreedhar patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.