Join us

Sanjay Raut: पुढच्या आठवड्यात 'ईडी'चा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार, संजय राऊतांनी हात ठोकून ठिकाणही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 3:06 PM

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय वगनाट्याचा पुढील अंक आज पाहायला मिळाला. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि विनायक राऊतांवर हल्लाबोल केला.

मुंबई-

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय वगनाट्याचा पुढील अंक आज पाहायला मिळाला. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि विनायक राऊतांवर हल्लाबोल केला. त्यानंतर शिवसेना भवनात विनायक राऊत यांनी पत्राकर परिषद घेऊन राणेंवर प्रतिहल्ला केला. याच पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अचानक एन्ट्री घेत मोठी घोषणाच केली आहे. संजय राऊत यांनी आता थेट ईडीला आव्हान दिलं आहे. पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

ईडीच्या चौकशांची भीती घालून सर्वांच्या कुंडल्या हातात असल्याचं हे किरीट सोमय्या सांगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याही कुंडल्या आमच्या हातात आहे आणि आम्ही आरोप सुरू केले तर एक दिवस असा नक्कीच येणार आहे की तुम्हाला या महाराष्ट्रातून तोंड काळ करून जावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले. 

राऊतांचं थेट 'ईडी'ला आव्हानईडीचे अधिकारी कसे मोठ्या घोटाळ्यात सहभागी आहेत याची भांडाफोड लवकरच करणार आहे. पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी बसून मी ईडीचा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार आहे, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. त्यामुळे आता राऊतांच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

पालघरमधील तो प्रोजेक्ट कुणाचा?पालघरमध्ये एका गावात किरीट सोमय्यांचा एक मोठा प्रोजेक्ट सुरू असून त्याची किंमत २६० कोटी रुपये आहे. यात त्यांचा मुलगा निल सोमय्या देखील आहे आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या डायरेक्टर आहे. इतकंच नव्हे, तर ईडीचाही अधिकारी यात आहे. मग यांच्याकडे हे इतके कोटीच्या कोटी रुपये येतात कुठून?, असा सवाल करत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल यावेळी केला. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाविनायक राऊत अंमलबजावणी संचालनालय