Sanjay Raut: उत्तर प्रदेशात काहींना हवामानाचा अंदाज आलाय, भाजपानं सावध राहावं, शिवसेना ५० जागा लढणार; संजय राऊतांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 05:55 PM2022-01-11T17:55:31+5:302022-01-11T17:56:04+5:30

उत्तर प्रदेशात भाजपाला एकामागोमाग एक धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर आणखी तीन भाजपा आमदारांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Sanjay Raut says BJP should be careful Shiv Sena will contest 50 seats in uttar pradesh | Sanjay Raut: उत्तर प्रदेशात काहींना हवामानाचा अंदाज आलाय, भाजपानं सावध राहावं, शिवसेना ५० जागा लढणार; संजय राऊतांचा एल्गार

Sanjay Raut: उत्तर प्रदेशात काहींना हवामानाचा अंदाज आलाय, भाजपानं सावध राहावं, शिवसेना ५० जागा लढणार; संजय राऊतांचा एल्गार

Next

मुंबई-

उत्तर प्रदेशात भाजपाला एकामागोमाग एक धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर आणखी तीन भाजपा आमदारांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकंच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषेदत उत्तर प्रदेशात भाजपाचे १२ आमदार समाजवादी पक्षात दाखल होण्याची शक्यता असल्याचं सांगत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही उत्तर प्रदेशातील घडामोडींवर महत्त्वाचं विधान केलं आहे. 

"गोव्यात भाजपाचे मंत्री आणि आमदाराने भाजपा सोडला म्हणजे गोव्यात भाजपा अभेद्य नाही. उत्तर प्रदेशात देखील अनेक आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. याचाच अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आलाय. मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळे भाजपानं सावध राहावं", असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. 

उत्तर प्रदेशात शिवसेना ५० जागांवर लढणार
"लाटांचे तडाखे बसायला सुरूवात झाली आहे. सध्या मंद लाटा आहेत. पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू शकते. शिवसेना उत्तर प्रदेशात ५० जागा लढवेल. मी उद्या दिल्लीत व परवा उत्तर प्रदेशात जात आहे. भाजपा ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. गोवा आणि उत्तर प्रदेशात परिवर्तन निश्चित आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

...तर गोव्यात स्वबळावर लढू
"गोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. जर काही मनाप्रमाणे नाही घडले तर आम्ही स्वबळावर लढू. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आताच वेणूगोपाळ यांच्याशी चर्चा झाली. एकत्र लढलो तर गोव्यात परिवरर्तन घडवू शकतो. सेनेसारखा हिंदू विचारांचा पक्ष आघाडीत असणं चांगलं आहे. गोव्यात तृणमुलसोबत जाणार नाही. भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकाचवेळी चर्चा नाही. गोव्यात महाविकास आघाडी असावी, जर काँग्रेसची इच्छा नसेल तर मग स्वबळावर लढू", असंही संजय राऊत म्हणाले. 

Web Title: Sanjay Raut says BJP should be careful Shiv Sena will contest 50 seats in uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.