Sanjay Raut: "नारायण राणेंनी माफी मागितली नाही तर..."; संजय राऊतांचा रोखठोक इशारा, नोटीसही पाठवली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 10:59 AM2023-02-03T10:59:57+5:302023-02-03T11:00:58+5:30

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Sanjay Raut sends legal notice to narayan rane | Sanjay Raut: "नारायण राणेंनी माफी मागितली नाही तर..."; संजय राऊतांचा रोखठोक इशारा, नोटीसही पाठवली!

Sanjay Raut: "नारायण राणेंनी माफी मागितली नाही तर..."; संजय राऊतांचा रोखठोक इशारा, नोटीसही पाठवली!

googlenewsNext

मुंबई-

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. सार्वजनिक मंचावरुन नारायण राणे यांनी खोटे आरोप केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. खुद्द संजय राऊत यांनीच ट्विटरच्या माध्यमातून राणे यांना पाठवलेल्या नोटीस बाबतची माहिती दिली आहे. नारायण राणे यांनी या नोटीसनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. 

माणसाने भाजपच्या नादाला लागून किती खोटे बोलावे याला ही काही मर्यादा आहेत. नारायण राणेंनी सतत माझ्याविषयी काही वक्तव्य केली आहेत. त्यामुळे मी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करेन. किरीट सोमय्यांवर देखील मी खटला दाखल करणार आहे. फक्त मीच नाही तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर अशाप्रकारचे आरोप होत आहेत ते सर्व नेते खटले दाखल करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे

"नारायण राणे सार्वजनिक मंचावरुन तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेनेबाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात. हे आरोप त्यांनी सिद्ध करावेत. अन्यथा माफी मागावी. माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाईबाबत नोटीस बजावली आहे. कर नाही तर डर कशाला? जय महाराष्ट्र!", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

राणे उद्या बाळासाहेबांचीही त्यांनीच नियुक्ती केली म्हणतील- राऊत
संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला. नारायण राणे उद्या आपणच बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुखपदी नियुक्ती केली असंही म्हणतील, असं संजय राऊत म्हणाले. "नारायण राणे म्हणतात २००४ साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? आता नारायण राणेंनी बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मीच निवड केली हे सांगणे बाकी आहे. नारायण राणे काहीही वक्तव्य करु शकतात. 2004 साली मी सामनाचा संपादक होतो. माझे मतदारयादीत नाव नाही असेही म्हणाले. आता २५ वर्षापासून मी मतदान करत आहे. माझे शिक्षण मुंबईत झाले. मी देशाचा नागरिक आहे. मला मतदानाचा हक्क आहे. २००४ साली देखील माझे नाव मतदार यादीत होते", असं संजय राऊत म्हणाले.

Web Title: Sanjay Raut sends legal notice to narayan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.