मुंबई - जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या अहमदाबादमधील मोटेराचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. दरम्यान, या नामकरणावरून आता जोरदार राजकारण पेटले आहे. सरदार पटेलांचे नाव वगळून स्वत:चे नाव देण्याच्या निर्णयावरून नरेंद्र मोदींवर विरोधक सडकून टीका करत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला. त्यानंतर, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना, हे असले पांचट विषय बंद करावेत, असे म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिल्या क्रमांकाचे नेत आहेत, ते मोठेच नेते आहेत. पण, संजय राऊत खालच्या कुठल्या क्रमांकाचे नेते आहेत, हे मला माहित नाही. संजय राऊतांनी स्टेडियमच्या नावावरुन टीका केलीय. पण, आक्षेप कोणाचा आहे? स्टेडियलमा मोदींचं नाव न देण्यासाठी कोणाचा आक्षेप आहे का, असा सवाल राणेंनी विचारला. तसेच, सुब्रोतो रॉय यांच्या पुण्याच्या स्टेडियमच्या उद्घाटनाला शरद पवार गेले होते, त्यावेळी या स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचे नाव होते. मग, सुब्रोतो राय शरद पवारांपेक्षा मोठे झाले का? असेही ते म्हणाले. संजय राऊत यांनी पांचट विषय बंद करावेत, देशासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. जर, आक्षेपच नसेल तर पोटात का दुखतंय. आम्ही आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला. मूळात, संजय राठोड हे प्रकरण शिवसेनेसाठी अडचणीचं ठरत आहे. त्यामुळे, हे असले विषय काढून विषय वळविण्याचा हा प्रयत्न असल्याच टीका निलेश राणे यांनी केलीय.
उद्धव ठाकरेंवरही टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी, गर्दी करू नये असं आवाहन केले होते, मात्र त्याचनंतर शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हजारोंच्या संख्येने शक्तीप्रदर्शन केले, यावरून भाजपा सचिव निलेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे म्हंटले की, ठाकरे सरकार संजय राठोडला वातवतंय, सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतो, कॅबिनेट मिटिंगमध्ये बसतो, पण तरीही राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही, परत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कधीही स्वत:च्या भाषणात मी मर्द आहे असं म्हणू नये असा टोला त्यांनी लगावला आहे.
संजय राऊत काय म्हणाले
स्टेडियमला नाव दिल्याच्या निर्णयांबाबत एखादा राजकीय पक्ष किंवा सरकार फार काही बोलू शकत नाहीत. प्रत्येक राज्यात अनेक नेत्यांची नावे अशा प्रकारे दिली जातात. आता स्टेडियमला नाव देण्यास त्या राज्यातील सरकार आणि क्रिकेट संघटनेने मान्यता दिली आहे. मात्र मोदी आता मोठे नेते झाले आहेत. त्यामुळे मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.