ईडी आणि सीबीआय हे काय तुमचे कार्यकर्ते आहेत का?; अनिल देशमुखांवर ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 12:48 PM2021-06-25T12:48:53+5:302021-06-25T12:51:20+5:30

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीच्या छाप्यावरुन भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 

Sanjay Raut slammed bjp for ed raid on Anil Deshmukh house in mumbai and nagpur | ईडी आणि सीबीआय हे काय तुमचे कार्यकर्ते आहेत का?; अनिल देशमुखांवर ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत कडाडले

ईडी आणि सीबीआय हे काय तुमचे कार्यकर्ते आहेत का?; अनिल देशमुखांवर ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत कडाडले

googlenewsNext
ठळक मुद्देअनिल देशमुखांवर ईडीच्या छापेमारीवर संजय राऊत यांचा भाजपवर निशाणाकेंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोपअनिल देशमुखांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीचा छापा

Sanjay Raut: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापा टाकण्यात आला आहे. गेल्या तीन तासांपासून ईडीचे अधिकारी देशमुखांच्या निवासस्थानी चौकशी करत आहेत. ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या या छाप्यावरुन भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 

नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू

"सीबीआय, ईडी काय भाजपाची कार्यकर्ती आहे का?", असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करुन केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन केंद्र सरकार विनाकारण त्रास देण्याचं काम करत असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील नेत्यांवर विनाकारण आरोप करुन त्याचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रकार केला जाता असल्याचंही राऊत म्हणाले. 

मुंबई, नागपूरात ईडीचे छापे, तगडा बंदोबस्तही तैनात; पण अनिल देशमुख नेमके आहेत तरी कुठे?

"अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापेमारी केल्याचं कळालं. मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे. सीबीआय आणि ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का? ईडी आणि सीबीआय देशातील प्रमुख संस्था आहेत. पण त्यांची आज बदनामी होतेय हे संबंधितांनी लक्षात घ्यावं. महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही. काल अनिल परब आणि अजित पवारांच्या चौकशीचा ठराव भाजपनं बैठकीत केला. हे नेमकं कुठलं राजकारण आहे?", असं संजय राऊत म्हणाले. 

अयोध्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा
"सीबीआयला जर तपास करायचा असेल तर सगळ्यात मोठं आणि महत्वाचं प्रकरण म्हणजे अयोध्येतील महापौरांनी अयोध्या ट्रस्टसोबत केलेल्या व्यवहाराची चौकशी करा. ती सीबीआयसाठी एकदम फिट केस आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

Web Title: Sanjay Raut slammed bjp for ed raid on Anil Deshmukh house in mumbai and nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.