मुंबई - भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरातील एका पुस्तिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. शिबिरात वाटप करण्यात आलेल्या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मनात कचरा असल्याचं परखड मत व्यक्त करत संजय राऊत यांनी काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरातील पुस्तिकेचा चांगलाच समाचार घेतला आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर महान होते आणि कायम महान राहतील. जे लोक त्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्या मनात कचरा आहे. मग ते कोणीही असतील' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस सेवा दल प्रशिक्षण शिबिरात 'वीर सावरकर-कितने 'वीर' या नावाच्या एका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले होते. या पुस्तिकेत सावरकर यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या घटना, प्रश्न, वादांबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका
महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?
नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले
दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही भाजपचीच सत्ता येणार; अमित शाह यांचा दावा
सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या