Join us

संजय राऊतांकडून भाजपवर निशाणा; पवारांची भेट, अन् खोचक 'कार्टुन ट्विट'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 10:57 PM

संजय राऊत यांनी शनिवारी दुपारी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये एका ज्योतिषाचा फोटो दाखवला

मुंबई : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या कारवाईचे पडसाद राज्यभरात सगळीकडे उमटू लागले होते. यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही शरद पवार यांना पाठिंबा देत या कृत्याचा निषेध नोंदविला होता. त्यानंतर, शिवसेनेचे नेते संजय राऊत शरद पवार यांच्या घरी गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर, संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करत भाजपाला लक्ष्य केलं आहे.  

संजय राऊत यांनी शनिवारी दुपारी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये एका ज्योतिषाचा फोटो दाखवला असून तो आपल्याकडे भविष्य पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तीस ईडीपिडा असल्याचं सांगतो. 'तुम्हाला शनिपिडेपेक्षा डेंजर ईडीपिडा सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यावर उपाय म्हणजे कमळाचे फूल जवळ ठेवा', असे म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटचा मतितार्थ हा भाजपला लक्ष्य करण्याचाच असल्याचे स्पष्ट होते. पवारांसोबत भेट अन् भाजपावर व्यंगचित्रातून टीका, यामुळे युतीत आलबेल नसल्याचेच दिसून येते.   युतीचे गुऱ्हाळ सुरू आहे. भाजपाने दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मॅरेथॉन बैठक घेत शिवसेनेसमोर 144-126 असा फॉर्म्युला ठेवला आहे. तसेच काही जागांची अदलाबदलही ठेवली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत युती होणार की तुटणार यावर निर्णय यायचा आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेने शरद पवारांना पाठिंबा दिल्याने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेगळी आघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शरद पवारांच्या मुंबईतील घरी सिल्व्हर ओकवर अजित पवार यांच्याशी शरद पवार यांची बैठक झाली. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. अजित पवार यांच्यासोबतची बैठक संपली असून ते आता पत्रकार परिषद घेणार आहेत. तर अजित पवार तिथून निघाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. 

शिवसेनेचा पाठिंबाशरद पवार फक्त महाराष्ट्रातील देशातील महत्वाचे नेते. ज्या प्रकरणात शरद पवारांचे नाव नाही तरीही गुन्हा दाखल होत असेल तर त्याबाबत लोकांच्या मनात शंका उपस्थित होणं स्वाभाविकच आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.  

टॅग्स :संजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाभाजपाव्यंगचित्रकार