Sanjay Raut Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:03 PM2023-03-10T12:03:41+5:302023-03-10T12:04:30+5:30

संजय राऊतांची मनसे पक्षावर खोचक शब्दांत टीका

Sanjay Raut trolled Raj Thackeray over Uddhav Thackeray losing CM post in Mahavikas Aghadi | Sanjay Raut Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की..."

Sanjay Raut Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की..."

googlenewsNext

Sanjay Raut Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ठाण्यातील कार्यक्रमात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "हिंदुत्वाला मानता म्हणजे नेमकं काय असतं तुमचं? भोंगा प्रकरणानंतर अयोध्याला जाणार होतो, पण विरोध करणारे हिंदुत्ववाले होते, ज्यांनी हे सगळं केलं, त्याचं पुढे काय झालं? आंदोलनावेळी मनसेच्या १७ हजार कार्यकर्त्यांवर केस टाकल्या, आमच्या वाटेला गेले म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं", अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

मनसेच्या वाटेला गेल्यामुळेच काही लोकांची मुख्यमंत्रीपद गेले असा टोला राज ठाकरेंनी लगावला होती. त्यावर संजय राऊतांनी खोचक टीका केली. "कुणी कुणाच्या वाटेला गेलं नाही. राज ठाकरेंच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद का गेलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर त्यांच्या पक्षाची आणखी वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सरकार ईडी, सीबीआयचा वापर करून पाडण्यात आले आणि जोडीला खोके देण्यात आले. ईडी काय आहे ते मी राज यांना सांगणार नाही, त्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे," अशी संजय राऊतांनी अतिशय शेलक्या शब्दांत राज यांच्यावर टीका केली.

दरम्यान, "शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. शिवसेना प्रत्येक तहसील कार्यालयावर जाऊन आंदोलन करत आहे. तात्काळ पंचनामे आणि मदत करा अशी आमची भूमिका आहे. सामन्यांना न्याय मिळावा ही शिवरायांची भूमिका होती, त्याच भूमिकेतून शिवसेना काम करत आहे," असेही राऊत म्हणाले. तिथीने शिवजयंती साजरी करण्याच्या उद्देशाने राज्यभरात शिवजयंती साजरी केली जात आहे. त्याच निमित्ताने राऊतांनी संवाद साधला.

"तर महाराष्ट्रातील १२ कोटी जनता त्यांचा धर्म दाखवेल"

"महाराष्ट्रातील आणि देशातील सरकारने जात आणि धर्म यांच्या आधारावर राजकारण सुरू केले आहे. शेतकऱ्यांना जात विचारली जात असून त्यानंतर मदत दिली जात असल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पण जर प्रत्येक ठिकाणी 'जात दाखवण्याचं' काम राज्य सरकार करत असेल तर मग शेवटी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला त्यांचा 'महाराष्ट्रधर्म' दाखवावा लागेल", अशा शब्दांत राऊतांनी इशारा दिला.

Web Title: Sanjay Raut trolled Raj Thackeray over Uddhav Thackeray losing CM post in Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.