Join us

"संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, आमदारांच्या बैठकाही घेतल्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 2:16 PM

संजय राऊतांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी कित्येक आमदारांच्या बैठका घेतल्या, नरेस म्हस्के यांचा दावा

मुंबई-

राज्यातील सरकारचा ३१ डिसेंबर हा शेवटचा दिवस असून शिंदे नव्या वर्षात मुख्यमंत्री नसतील आणि २०२४ मध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळतील असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावर शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी असले खोटे दावे करु नयेत, असं म्हटलं आहे. 

"संजय राऊतांच्या आजच्या विधानानं स्पष्ट झालं आहे की जे काही चाललेलं आहे ते फक्त मुख्यमंत्रिपदासाठी चाललेलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हे सगळं सुरू आहे. या संजय राऊतांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी कित्येक आमदारांच्या बैठका घेतल्या. उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरुन उठवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या डोक्यात विचार घालणारा माणूस देखील संजय राऊतच आहेत. त्यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचं होतं पण त्यांचं स्वप्नभंग झालं. जे आमदार राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते त्यांना राऊत काय सांगत होते? त्यांच्या बैठका कशासाठी घेत होते? हे एकदा त्यांनी सागावं. पवईतील हॉटेलात आमदारांच्या बैठका कशासाठी घेतल्या होत्या हे राऊतांना विचारा", असं नरेश म्हस्के म्हणाले. 

नोकऱ्या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा होतोय, रोजगाराच्या संधी मोदी सरकारने पळवल्या; सामनातून हल्लाबोल

उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले याचं दु:खं संजय राऊतांना होतं. तेच दु:ख ते दररोज सकाळी आरडा-ओरडा करुन व्यक्त करत असतात, एक दिवस सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असंही म्हस्के म्हणाले. 

संजय राऊत काय म्हणाले?"आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्रा इथं जाणार आहोत, विरोधकांचा समचार नाही तर छातीवर पाय देऊन समाचर घेऊ", असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात मोगलाई सुरू आहे. आता आमच्या शाखांवर बुलडोझर फिरवत आहेत. बाळासाहेब ठाकरे या शाखांना मंदिरं मानत होते. उद्धव ठाकरे यांना मुब्र्यात येण्यापासून पोलीस रोखत आहेत. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आल्या. त्यांना तडीपार करण्याची धमकी देत आहेत. पोलिसांसमोर बॅनर फाडत आहेत. जे आता आम्हाला अडवात होते, त्यावेळी शाखा तोडताना पोलीस कुठे होते? जे पोलीस शिंदे सरकारची चाकरी करत आहेत त्यांना एवढंच सांगत आहोत की ३१ डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील", असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदे