संजय राऊतांच्या आमदार भावाने त्रास दिला! मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, माजी नगरसेविका शिंदेंच्या शिवसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:21 AM2023-06-15T11:21:02+5:302023-06-15T11:21:36+5:30
गेल्या 6 वर्षांपासून आमदार सुनील राऊत त्रास देत होते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्या म्हणाल्या.
मुंबईच्या विक्रोळी कांजूरमार्ग प्रभाग क्रमांक 117 च्या नगरसेविका सुवर्णा करंजे यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती ठाण्यातील टेंभी नाका येथे हा प्रवेश केला आहे. यावेळी करंजे यांनी संजय राऊत यांचे आमदार भाऊ सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुनील राऊत या एका माणसामुळे मी मातोश्रीची साथ सोडल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या 6 वर्षांपासून आमदार सुनील राऊत त्रास देत होते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्या म्हणाल्या.
मला संपवण्याचा प्रयत्न झाला. कांजूर भांडुप पूर्व विभागात रुग्णालयाची गरज आहे. परंतू त्यात राऊत यांनी अडचणी आणल्या. आरक्षण बदलले. एकनाथ शिंदे यांनी मला आता शब्द दिला आहे. यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपण 500 सदस्य असलेल्या रिक्षा सेना आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मातोश्रीवर राग नाही, संजय राऊतांना वेळोवेळी सांगतिले होते. परंतू त्यांनी भाऊ असल्याने काही केले नाही, असा आरोप करंजे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी सगळ्यांची कुंडली मला माहीत आहे.त्यामुळे तुम्ही चांगलं काम करा संघटन बळकट करा, असे सांगितले. सगळ्यांना सोबत घ्या कुठे काही कमी पडणार नाही ही ग्वाही मी देतो. शिवसेनेची जवाबदारी म्हणून शिवसेनेचं उपनेते पद सुवर्णताई करंजे यांना देण्यात येत आहे अशी घोषणा शिंदे यांनी केला.