Shiv Sainiks' attack on Kirit Somaiya: संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं समर्थन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 10:12 AM2022-04-24T10:12:32+5:302022-04-24T10:13:38+5:30

Shiv Sainiks' attack on Kirit Somaiya: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Sanjay Raut's support for Shiv Sainiks' attack on Kirit Somaiya, said ... | Shiv Sainiks' attack on Kirit Somaiya: संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं समर्थन, म्हणाले...

Shiv Sainiks' attack on Kirit Somaiya: संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं समर्थन, म्हणाले...

Next

मुंबई - पोलीस कोठडीत असलेल्या रवी राणा आणि नवनीत राणा यांना भेटण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्यांवर खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर भाजपा नेते शिवसेनेविरोधात आक्रमक झाले आहेत. तसेच कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात की, आयएनएस विक्रांतच्या निधीचा अपहार करणारा आरोपी बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेल्या दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो. त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र होतात. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? आयएनएस विक्रांत घोटाळा हा देशद्रोह आहे! जय महाराष्ट्र, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खार पोलीस ठाण्यात रवी राणा आणि नवनीत राणा यांना भेटण्यासाठी आलेले माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर काल रात्री हल्ला करण्यात आला होता. शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटून त्यांना दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर जमले होते. यावेळी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती.

त्यानंतर शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या किरीट सोमय्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून किरीट सोमय्या यांच्या ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २७९ आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

Web Title: Sanjay Raut's support for Shiv Sainiks' attack on Kirit Somaiya, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.