‘महाराष्ट्रद्रोही, मराठीद्वेष्ट्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत समजावणार’, सोमय्यांबाबत वापरलेल्या भाषेचं संजय राऊतांकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:57 AM2022-02-21T11:57:28+5:302022-02-21T11:58:24+5:30

Sanjay Raut News: सध्या महाराष्ट्रात BJP नेते Kirit Somaiya आणि शिवसना नेते संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. त्यात संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करत असलेल्या सोमय्यांवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरत असून, ते सोमय्यांवर शिवराळ भाषेत टीका करत आहेत.

Sanjay Raut's support for the language used against Kirit Somaiya | ‘महाराष्ट्रद्रोही, मराठीद्वेष्ट्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत समजावणार’, सोमय्यांबाबत वापरलेल्या भाषेचं संजय राऊतांकडून समर्थन

‘महाराष्ट्रद्रोही, मराठीद्वेष्ट्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत समजावणार’, सोमय्यांबाबत वापरलेल्या भाषेचं संजय राऊतांकडून समर्थन

Next

मुंबई - सध्या महाराष्ट्रात भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसना नेते संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. त्यात संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करत असलेल्या सोमय्यांवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरत असून, ते सोमय्यांवर शिवराळ भाषेत टीका करत आहेत. मात्र आता संजय राऊत यांच्याकडून या भाषेचं समर्थन करण्यात आलं असून, जे महाराष्ट्रद्रोही आहेत. जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत. ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी कायम द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्या भाषेतच बोलावं, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भाषेचं समर्थन केलं आहे.

याबाबत परसार माधयमांशी बलताना संजय राऊत महणाल की, जे महाराष्ट्रद्रोही आहेत. जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत. ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी कायम द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्या भाषेतच बोलावं. मुंबईत आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात जर कुणी महाराष्ट्रद्रोही एखाद्या राजकीय पक्षाचा बुरखा पांघरून आणच्यावर आणि महाराष्ट्रावर थुंकत असेल, तर  मला आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. आम्हाला कुणी मराठी शिकवू नये.

दरम्यान, गेल्या मंगळवारी संजय राऊत राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा तुरुंगात जाणार असा इशारा दिला होता. तसेच सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा त्यांनी उल्लेख केला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत प्रत्येकवेळी शेलक्या शब्दात किरीस सोमय्या यांचा समाचार घेत आहे.    

Web Title: Sanjay Raut's support for the language used against Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.