मुंबई : मध्य रेल्वेच्या महा-व्यवस्थापकपदी शुक्रवारी संजीव मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. सुमारे चार महिन्यांनंतर हे रिक्त पद भरण्यात आले आहे. संजीव मित्तल भारतीय रेल्वे इंजिनीअर्स सेवेच्या १९८२ बॅचचे वरिष्ठ अधिकारी आहेत. शुक्रवारपासून त्यांनी महाव्यवस्थापकपदाचा कारभार हाती घेतला. ते याआधी कोलकाता येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) येथे कार्यरत होते. महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांच्या निवृत्तीनंतर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा अधिभार होता.
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी संजीव मित्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:12 IST