मुंबई - बॉलिवूडचा साजन संजय दत्तचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित बायोपिक सिनेमा 'संजू' 29 जूनला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या सिनेमामध्ये रॉकस्टार रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. संजय दत्तच्या तारुण्यापासून ते वर्तमानातील सर्व भूमिका स्वतः रणबीरनं उत्तमरित्या साकारल्याचं सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसत आहे. दरम्यान, संजूबाबाचे वडील म्हणजे सुनील दत्त यांची भूमिका अभिनेता परेश रावल साकारणार आहेत. रणबीरच्या अभिनयामुळे परेश रावल अतिशय प्रभावित झाले आहेत. रणबीरचं 'संजू' सिनेमातील काम हे प्रत्येक अॅक्टिंग स्कूलमध्ये दाखवण्यात यावे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
(रणबीर कपूर नाही तर 'हा' अभिनेता होता 'संजू'साठी निर्मात्यांची पहिली पसंत)
परेश रावल यांनी रणबीरच्या अभिनयाचं कौतुक करत म्हटलं की, रणबीरनं भूमिकेला अपेक्षहून अधिक न्याय दिला आहे. रणबीरचं संजू सिनेमातील काम अॅक्टिंग स्कूलमध्ये दाखवलं गेलं पाहिजे. रणबीरनं ही कठीण भूमिका अतिशय वेगळ्या आणि अचूक पद्धतीनं निभावली आहे. यापूर्वी हॉलिवूड सिनेमा 'गॉडफादर 2' चे अभिनेते रॉबर्ट डी नीरो यांचा अशा पद्धतीचा दर्जेदार अभिनय मी पाहिला आहे.
दरम्यान, 'संजू' सिनेमात संजय दत्तच्या आयुष्यातील खरे सीन्स साकारणं किती कठीण होतं, प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणबीर कपूर सांगत असतो. खरंतर याचा अंदाज ट्रेलर पाहून कुणीही लावू शकता. रणबीरच्या या मेहनतीचं सर्वांकडून कौतुकही केलं जात आहे. संजय दत्त साकारण्यासाठी रणबीरला अनेक अडचणी आल्या.